डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 01:50 PM2019-07-07T13:50:30+5:302019-07-07T14:18:37+5:30
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली - हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीनेभाजपामध्ये प्रवेश केला आहे. रविवारी (7 जुलै) दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सपनाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपा नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह आदींसह अन्य दिग्गज नेते उपस्थित होते.
दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये सहभाग घेत सपनाने आज भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. सपना चौधरी ही तेरी आंख्या को यो काजोल... मन करे से गोरी घायल.... या गाण्यामुळे देशभर पोहोचली असून तिचे खूप फॅन फॉलोवर्स आहेत.
Haryanavi dancer Sapna Chaudhary joins Bharatiya Janata Party at the party's membership drive program in Delhi. pic.twitter.com/G9jmj0tOrt
— ANI (@ANI) July 7, 2019
लोकसभा निवडणुकीवेळी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील होण्याचे वृत्त सपना चौधरीने फेटाळले होते. सपनाने पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेसमध्ये सामील झालो नसल्याचे देखील म्हटले होते. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो जुने होते, असंही सपनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर सपना भाजपामध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात होते. या संदर्भात मनोज तिवारी यांनी ती भाजपामध्ये येणार की नाही, हे येणाऱ्या काळातच समजेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता सपना चौधरीने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.