बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार हाशीम अन्सारी यांचं निधन

By admin | Published: July 20, 2016 08:17 AM2016-07-20T08:17:12+5:302016-07-20T08:17:12+5:30

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर या प्रकरणात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वात जुने पक्षकार मोहम्मद हाशीम अन्सारी यांचं निधन झालं आहे

Hashim Ansari dies in Babri Masjid case | बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार हाशीम अन्सारी यांचं निधन

बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार हाशीम अन्सारी यांचं निधन

Next
ऑनलाइन लोकमत - 
अयोध्या, दि. 20 - अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर या प्रकरणात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वात जुने पक्षकार मोहम्मद हाशीम अन्सारी यांचं निधन झालं आहे. सकाळी 5.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 96 वर्षांते होते. गेले काही दिवस त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच लोकांनी त्यांच्या घरी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
 
23 डिसेंबर 1949 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तूमध्ये मुर्ती ठेवण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम मोहम्मद हाशीम अन्सारी यांना खटला दाखल केला होता. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. 8 महिने त्यांना कारागृहात काढावे लागले होते. अयोध्येत आंदोलनादरम्यान तणाव असताना लोकांना शांततेचं आवाहन करणारे मोहम्मद हाशीम अन्सारी यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तितकाच सन्मान मिळत होता.  
 
 
बाबरी प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अन्सारी यांनी 2014 मध्ये हा खटला न लढवण्याची घोषणा केली होती. आता रामलल्ला मुक्त झालेला पाहायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या जातीची काळजी आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. राजकारण करणारे सरकारचा पैसा घेऊन फायदे लाटतात मात्र मोदी खासदार, आमदारांना एक- एक पैशांचा हिशेब मागतात. ते चांगले व्यक्ती आहेत, असे हाशीम अन्सारी यांनी म्हटले होते.
 

Web Title: Hashim Ansari dies in Babri Masjid case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.