ट्विटरवर ट्रेंड होतोय 'हॅशटॅग गोडसे_मुर्दाबाद'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:03 AM2019-11-16T11:03:13+5:302019-11-16T11:12:06+5:30

कालपासून आज सकाळपर्यंत ५६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरून ट्विटवर पोस्ट केले आहेत.

The hashtag Godse Murdabad is trending on Twitter | ट्विटरवर ट्रेंड होतोय 'हॅशटॅग गोडसे_मुर्दाबाद'

ट्विटरवर ट्रेंड होतोय 'हॅशटॅग गोडसे_मुर्दाबाद'

Next

- मोसीन शेख 

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला आजच्या दिवशीच फाशी देण्यात आली होती. १५ नोव्हेंबर १९४९ रोजी ही फाशी देण्यात आली होती. यामुळे ट्विटवर हॅशटॅग गोडसे_मुर्दाबाद ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. तर गोडसे_मुर्दाबाद हा हॅशटॅग ट्विटर इंडियावर टॉप ट्रेण्डींगवर आहे. कालपासून आज सकाळपर्यंत ५६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरून ट्विटवर पोस्ट केले आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ रोजी नाथूराम गोडसेने गोळ्या घालून हत्या केली होती.तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांनतर या प्रकरणी पोलिसांनी गोडसेच्या इतर साथीदारांनाही अटक केली होती. पुढे या सर्वांवर खटला चालविला गेला, काहींना निर्दोष सोडण्यात आले तर उरलेल्यांना कटात सामील असल्याने फाशी देण्यात आली. तर १५ नोव्हेंबर १९४९  रोजी हत्येच्या आरोपाखाली नथुरामला अंबाला तुरूंगात फाशी देण्यात आली.

त्यामुळे शुक्रवारी (१५ नोव्हेंबर रोजी ) महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेचा निषेध म्हणून ट्विटवर #गोडसे_मुर्दाबाद अशा पोस्ट नेटकऱ्यांकडून टाकण्यात आल्या. पाहता-पाहता हा हॅशटॅग ट्विटवर टॉप ट्रेण्डींगवर आल्याचा पाहायला मिळाले.

 

 

 

 

Web Title: The hashtag Godse Murdabad is trending on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.