६० वर्षांत पहिल्यांदाच हॅट्रीक, जनतेने आपल्याला का निवडून दिले? मोदींनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 09:59 PM2024-08-31T21:59:03+5:302024-08-31T21:59:18+5:30

आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

Hat-trick for the first time in 60 years, why did people elect us? PM narendra Modi said the reason | ६० वर्षांत पहिल्यांदाच हॅट्रीक, जनतेने आपल्याला का निवडून दिले? मोदींनी सांगितले कारण

६० वर्षांत पहिल्यांदाच हॅट्रीक, जनतेने आपल्याला का निवडून दिले? मोदींनी सांगितले कारण

गेल्या ६० वर्षांत पहिल्यांदाच आपल्या सरकारने हॅट्रीक केली आहे. आज भारत अनोख्या यशाची कहानी लिहीत आहे. लोकांनी स्थिरता आणि आर्थिक विकासासाठी आपल्याला मतदान केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदींनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. आत्मविश्वास भारताच्या विकास आणि सुधारणांवरील नवीन विश्वास दर्शवतो. अनेक देशांतील सरकारांना आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतू भारतातील परिस्थिती वेगळी आहे. सध्याची सुरु असलेली प्रगती आणि स्थिर प्रशासनासाठी तरुण, महिलांनी मतदान केले आहे, असे मोदी म्हणाले. 

नुकत्याच घसरलेल्या जीडीपीवरून भाष्य करताना मोदी म्हणाले की भारताने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 10 वर्षात जगातील अर्थव्यवस्था 35 टक्क्यांनी वाढल्या तर भारताची अर्थव्यवस्था ९० टक्क्यांनी वाढली. आम्ही खूप लांब झेप घेण्याची तयारी करत आहोत, असाही दावा मोदी यांनी केला. आम्ही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे मोदी म्हणाले.

सुधारणा, कार्य करा आणि परिवर्तन हा मंत्र सरकारच्या कामकाजाचा आधार आहे. यानुसार अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, असेही मोदी म्हणाले. 

Web Title: Hat-trick for the first time in 60 years, why did people elect us? PM narendra Modi said the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.