हेट स्पीच प्रकरणी सपा नेते आझम खान यांना ३ वर्षांची शिक्षा, आता आमदारकीही जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 06:11 PM2022-10-27T18:11:50+5:302022-10-27T18:18:41+5:30

उत्तर प्रदेशमध्ये न्यायालयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

hate speech case Samajwadi Party leader Azam Khan & 2 other accused sentenced to 3 years in prison | हेट स्पीच प्रकरणी सपा नेते आझम खान यांना ३ वर्षांची शिक्षा, आता आमदारकीही जाणार

हेट स्पीच प्रकरणी सपा नेते आझम खान यांना ३ वर्षांची शिक्षा, आता आमदारकीही जाणार

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्येन्यायालयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता आझम खान यांना आमदारकी गमवावी लागणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोर्टाने आझम खान यांना ३ वर्षांचा कारावास आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. १० वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेले आझम खान यांच्या राजकीय कारकिर्दीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिक्षेनंतर आझम खान यांना आता निवडणूक लढवता येणार नाही आणि त्यांचे विधानसभा सदस्यत्वही संपुष्टात येणार आहे. लोकप्रतिनिधींसाठी बनवलेल्या कायद्यानुसार आमदाराला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत् रद्द होते. यापूर्वी, अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभेतील भाजपचे आमदार खब्बू तिवारी यांना न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावल्यामुळे त्यांना आमदारकी गमवावी लागली होती.

Anand Mahindra: मुलीचं चमत्कारीक टॅलेंट पाहून आनंद महिंद्रा भारावले, Video शेअर करत दिली ऑफर

आझम खान यांनी आपल्या भाषणात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच नव्हे तर रामपूरच्या तत्कालीन डीएमवरही अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. आझम खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर रामपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संवेदनशील भागात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. शिक्षेनंतर आझम खान यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. मात्र, आझम खान या निर्णयाला ६०-९० दिवसांत आव्हान देऊ शकतात. 

Web Title: hate speech case Samajwadi Party leader Azam Khan & 2 other accused sentenced to 3 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.