Hathras Case : जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 50 कोटी पाठविले, ईडीचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 12:31 PM2020-10-07T12:31:45+5:302020-10-07T12:32:58+5:30

Hathras Case : हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Hathras Case: 50 crore sent from Mauritius to spread ethnic riots, ED reveals | Hathras Case : जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 50 कोटी पाठविले, ईडीचा खुलासा 

Hathras Case : जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 50 कोटी पाठविले, ईडीचा खुलासा 

Next
ठळक मुद्देहा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे.

लखनऊ : हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाजवळ (पीएफआय) ५० कोटी आले होते, असा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सुरुवातीच्या अहवालावरून समोर येत आहे. तसेच, हा सर्व निधी १०० कोटींपेक्षा जास्त होता, असा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यापैकी एक जामियाचा विद्यार्थीही आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड आहे, असल्याचा पोलिसांनी केला आरोप आहे. यापूर्वी, यूपी पोलिसांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दंगलीच्या कट रचल्याचा दावा केला आहे.

हाथरस पीडितेला न्याय मिळावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या या वेबसाइटवर बर्‍याच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. ईडीने हाथरसमध्ये दंगलीचा कट रचण्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल केला आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे, की यूपीमध्ये जातीय दंगली परवण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी देण्यात आला होता.

हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट 
हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगलीच्या आगीत यूपीला जाळून टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा यूपीच्या सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: विरोधकांवर जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याचा आरोप केला होता. त्यानंतर हाथरसमधीलघटनेविरोधात हिंसक निदर्शनांची तयारी सुरू होती, असा दावा युपीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी जस्टिस फॉर हाथरस व्हिक्टिम या नावाने ही वेबसाईट तयार केली होती.

Web Title: Hathras Case: 50 crore sent from Mauritius to spread ethnic riots, ED reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.