Hathras Gangrape : 'निर्भया'च्या वकील सीमा कुशवाह यांनाही पोलिसांनी रोखलं, पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव
By पूनम अपराज | Published: October 3, 2020 06:54 PM2020-10-03T18:54:18+5:302020-10-03T18:54:49+5:30
Hathras Gangrape : हाथरस घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून सीमा आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी तिच्या गावी जात होती. पण तिला जिल्हा प्रशासनाने थांबवले आणि जाण्यास मज्जाव केला.
निर्भया प्रकरणातील दोषींना फासावर लटकवून चर्चेत आलेली उत्तर प्रदेशमधील इटावा येथील वकील सीमा कुशवाह आता हाथरस पीडित मुलीला न्याय देण्यासाठी स्वतंत्र खटला लढणार आहेत. वास्तविक, हाथरस घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून सीमा आपल्या कुटूंबाला भेटण्यासाठी तिच्या गावी जात होती. पण तिला जिल्हा प्रशासनाने थांबवले आणि जाण्यास मज्जाव केला.
या दरम्यान, हाथरसच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी त्यांची झालेली चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. पत्रकारांनी त्यांना हाथरसात जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा खटला लढणार असल्याचे स्पष्ट केले आणि हे प्रकरण मानवतेसाठी लज्जास्पद आहे. या प्रकरणी ती कोणतीही फी घेणार नाही. त्या म्हणाल्या की, पीडितेच्या कुटूंबाची इच्छा आहे की, त्यांचा वकील म्हणून मी हा खटला लढावा, परंतु प्रशासन मला कुटूंबाला भेटू देत नाही. माझ्या भेटीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असे प्रशासन सांगत आहे. पोलिसांनी हाथरस मुलीचा मृतदेह जाळला आहे. मी निर्भयाला न्याय दिला आहे आणि या पीडितेला देखील न्याय मिळवून देणार आहे. सीमा म्हणाल्या की, कोणत्याही व्यवसायातील महिला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाहीत.
ज्योती ट्रस्टची कायदेशीर सल्लागार
सीमा समृद्धी सुप्रीम कोर्टाच्या वकील आणि निर्भया ज्योती ट्रस्टच्या कायदेशीर सल्लागार आहेत. दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर सीमा यांनी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 24 जानेवारी २०१४ रोजी सीमा निर्भया ज्योती ट्रस्टमध्ये रुजू झाली. सीमा कुशवाह मूळची उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील आहे. त्यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी इटावाच्या बिधीपूर ब्लॉकमधील तहसील चक्रानगर येथील माहेवा, तहसील चक्रानगर या छोट्याशा गावात उघापूर या गावी झाला. त्यांचे वडील बालादीन कुशवाह हे बिधीपूर ग्रामपंचायतीचे गावप्रमुखही होते. वडिलांच्या मृत्यूनंतर, आर्थिक संकटाशी दोन हात करून सीमाने कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. आर्थिक अवस्था बिकट असताना त्यांना प्रौढ शिक्षण विभागात कंत्राटी नोकरी देखील मिळाली. त्यांनी कानपूर विद्यापीठातून 2005 मध्ये एलएलबी पूर्ण केले. २००६ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठातून पत्रकारिता पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एमएही केले. सीमाला आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा होण्यापूर्वी तिनेही यासाठी तयारी केली.
ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती आमची मुलगी नाही, पीडितेच्या कुटूंबियांचा खळबळजनक दावा
सीमा यांचे पती राकेश हे मुंगेर, बिहार राज्यातील संग्रामपूर ब्लॉकमधील पौरिया गावातले आहेत. ते गणिताचे शिक्षक आहेत आणि दिल्लीतील आयआयटी तयारी संस्थेशी संबंधित आहेत. निर्भयाचा खटला लढताना तीसुद्धा बर्याच वेळा आजारी पडली असल्याचे सीमा सांगतात, पण त्यादरम्यान, पती राकेश सर्व वेळ माझ्यासोबत माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याने मला नेहमी प्रोत्साहन दिले.