हाथरस बलात्कार प्रकरण : आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस, विश्व हिंदू सेनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:28 PM2020-09-30T17:28:43+5:302020-09-30T17:30:51+5:30

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे.

Hathras rape case: Vishwa Hindu Sena announces Rs 25 lakh reward to cut the private part of the accused | हाथरस बलात्कार प्रकरण : आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस, विश्व हिंदू सेनेची घोषणा

हाथरस बलात्कार प्रकरण : आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस, विश्व हिंदू सेनेची घोषणा

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे.

विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नेपाळमधील एका तरुणाचे मुंडण केले होते. त्यानंतर वाराणसी पोलिसांनी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच विश्व हिंदू सेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र अरुण पाठक हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

आता अरुण पाठक यांनी सोशल मीडियावरून आपले एक वक्तव्य व्हायरल केले आहे. या व्हिडीओमधून अरुण पाठक यांनी योगी सरकारवर गंभीर आरोप करत दोषी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारने पीडित तरुणीवर ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले आहेत ते योग्य नाहीत. आता जी व्यक्ती या प्रकरणातील चारही आरोपींचे गुप्तांग कापेल. त्याला विश्व हिंदू सेनेकडून २५ लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा पाठक यांनी केली आहे

अरुण पाठक यांनी आपली ही विधाने सोशल मीडियावर फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून व्हायरल केली आहेत. यामध्ये सरकारसह पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अरुण पाठक हे सध्या फरार असून, वाराणसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.
 

 

Web Title: Hathras rape case: Vishwa Hindu Sena announces Rs 25 lakh reward to cut the private part of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.