Hathras Stampede : "बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 09:42 AM2024-07-05T09:42:44+5:302024-07-05T09:51:21+5:30
Hathras Stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा दिल्लीहून आलेल्या शिवमंगल सिंह यांच्या पत्नी जखमी झाल्या. सध्या त्या एएमयूच्या मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल आहे.
हाथरस येथे झालेल्या भीषण अपघातात १२१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींना विविध जिल्ह्यांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींना अलीगडच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पीडितांपैकी एक शिवमंगल सिंह आहेत, जे घटनेच्या दिवशी बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पत्नीसह दिल्लीहून आले होते.
हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा दिल्लीहून आलेल्या शिवमंगल सिंह यांच्या पत्नी जखमी झाल्या. सध्या त्या एएमयूच्या मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. यात बाबांचा काही दोष नसल्याचं शिवमंगल सांगतात. बाबा कधीही लोकांना आपल्या मागे या असं सांगत नाहीत. तो जनतेचा दोष आहे. बायकोला काहीही झालं तरी बाबांकडे जाणं सोडणार, थांबवणार नाही असंही म्हटलं आहे.
मीडियाशी बोलताना एटा येथील रहिवासी शिवमंगल सिंह म्हणाले की, माझी पत्नी आयसीयूमध्ये दाखल आहे, ती जखमी आहे. हाथरसमध्ये अपघात झाला त्यावेळी मी आणि माझी पत्नी तिथे होतो. आम्ही दिल्लीहून आलो होतो. त्यांच्याकडून चांगली प्रेरणा मिळत असल्याने आम्ही गेल्या दीड वर्षांपासून येत आहोत. चांगल्या मार्गावर कसं चालायचं हे दाखवलं. सर्व लोकांना एकत्र राहायला शिकवलं. ते चांगल्या गोष्टी सांगतात.
शिवमंगलने सांगितलं की, घटनेच्या वेळी मी तिथे होतो, पण थोडा दूर होतो. नंतर कळलं की येथे चेंगराचेंगरी झाली आहे. मी फोन केल्यावर माझ्या पत्नीच्या मैत्रिणींनी फोन उचलला. मी तिला विचारल्यावर तिने ती कुठे आहे हे सांगितलं. शोधत शोधत तिथे पोहोचलो पण तिथे माझी बायको सापडली नाही म्हणून मी हॉस्पिटल गाठलं. पत्नी तिथेच होती. तेथून तिला रेफर करण्यात आलं. आता अलिगड रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल आहे.
भोले बाबांचे कमांडो किंवा सेवकही यासाठी दोषी नाहीत. बाबांच्या मागे धावायला कोणालाही सांगितलं नाही. फक्त जनताच जबाबदार आहे. यासाठी पत्नीही दोषी आहे. जिथे गर्दी होती तिथे ती का गेली? तरीही आम्ही या कार्यक्रमाला जाणार आहोत. माझी पत्नी रुग्णालयात आहे. आम्हाला पुन्हा देखील जायला आवडेल. माझ्या पत्नीचे काहीही झाले तरी आम्ही जाणं बंद करणार नाही असंही शिवमंगलने म्हटलं आहे.