Hathras Stampede : प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे; महागडे चष्मे, सोन्याचं घड्याळ; अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:21 PM2024-07-03T12:21:09+5:302024-07-03T12:28:58+5:30

Hathras Stampede And Bhole Baba : भोले बाबांचा सत्संग आयोजित केला जातो तेव्हा तिथे प्रायव्हेट आर्मी सत्संगाची सुरक्षा, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग, पाणी इ. व्यवस्था करते. यामध्ये महिला देखील सहभागी होतात.

hathras stampede narayan sakar hari aka bhole baba security lifestyle | Hathras Stampede : प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे; महागडे चष्मे, सोन्याचं घड्याळ; अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाईल

Hathras Stampede : प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे; महागडे चष्मे, सोन्याचं घड्याळ; अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाईल

हाथरस येथील पुलराई गावात धक्कादायक घटना घडली आहे. भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, या दुर्घटनेत आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. सत्संग आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी यांनी हाथरस घटनेबाबत बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी पाठवलेल्या तीन मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा चर्चेत आले आहेत. त्यांच्यासंबंधीत काही रहस्य हळूहळू समोर येऊ लागली आहे. जेव्हा भोले बाबांचा सत्संग आयोजित केला जातो तेव्हा तिथे प्रायव्हेट आर्मी सत्संगाची सुरक्षा, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग, पाणी इ. व्यवस्था करते. यामध्ये महिला देखील सहभागी होतात. जिथे कार्यक्रम असतो त्या मैदानाच्या साफसफाईचं कार्य महिलांकडून करून घेतलं जातं. 

भोले बाबांचा भला मोठा आश्रम आहे. आश्रमाचे सर्व दरवाजे बंद असतात आणि प्रत्येक दरवाजावर पहारा आहे. भोले बाबा जिथे जातात तिथे त्यांचा ताफा देखील असतो. ताफ्यामध्ये सुरुवातीला जवळपास २५ बाईक आणि त्यावर लोक बसलेले असतात. त्यानंतर महागड्या वाहनांचा ताफा येतो आणि नंतर ताफ्याच्या मागे आणखी वाहनं असतात.

​​भोले बाबांची जीवनशैली अशी आहे की, मोठ्या श्रीमंतानाही पाहून धक्का बसेल. कपड्यांसाठी देखील पर्सनल डिझायनर्सची फौज आहे. इतर धर्मगुरूंप्रमाणे अंगावर भगवे कपडे घालत नाही किंवा त्यांच्यासारखी जीवनशैलीही जगत नाही. याउलट बाबा अतिशय टिप टॉप स्टाईलमध्ये राहतात. आलिशान आणि आरामदायी जीवनशैली जगत आहेत. 

पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. तसेच महागड्या चष्म्याचा शौक आहे. त्यांच्या हातात नेहमी सोन्याचं घड्याळ असतं. बाबांचे कपडे आणि शूज खास डिझाइन केलेले असून त्यासाठी वेगळे डिझायनर नेमले असल्याचं सांगितलं जात आहे. भोले बाबांचे अनुयायी कोणत्या देवाची पूजा करतात हे देखील स्पष्टपणे माहीत नाही. नमस्कार ऐवजी भोले बाबांचे समर्थक 'परमपिता परमेश्वर की संपूर्ण ब्रहमांड में सदा सदा के लिए जयजयकार हो जयजयकार हो' असं म्हणतात.

Web Title: hathras stampede narayan sakar hari aka bhole baba security lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.