Hathras Stampede : "मी प्रलय आणू शकतो, अधर्माचा नाश करेन"; चक्र दाखवून देव असल्याचं नाटक करायचे भोले बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:35 PM2024-07-03T14:35:48+5:302024-07-03T14:50:21+5:30

Hathras Stampede And Bhole Baba : हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

hathras stampede narayan sarkar hari hypocrisy bhole baba old video | Hathras Stampede : "मी प्रलय आणू शकतो, अधर्माचा नाश करेन"; चक्र दाखवून देव असल्याचं नाटक करायचे भोले बाबा

Hathras Stampede : "मी प्रलय आणू शकतो, अधर्माचा नाश करेन"; चक्र दाखवून देव असल्याचं नाटक करायचे भोले बाबा

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संग कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. भोले बाबांचा सत्संग होता. ज्यासाठी ८० हजारांची परवानगी असूनही अडीच लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. ​​भोले बाबा म्हणजेच ​​नारायण साकार हरी यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर भोले बाबांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते हातात चक्र फिरवत असून चमत्कार करत असल्याचा दावा करताना दिसत आहेत. आपण देव असल्याचं ते सर्वांना सांगायचे आणि हातात चक्र घेऊन ते फिरवण्याचं नाटक करायचे.  

"मी अधर्माचा नाश करेन. अनेकजण खोटे देव आणि बनावट सद्गुरू बनले आहेत. मी सर्व खोट्या सद्गुरूंचा नाश करून त्यांना कुष्ठरोगी बनवेन. आवश्यक असल्यास मी प्रलय आणू शकतो. मी संकल्प करतो. मी अधर्माचा नाश करेन. मी विषाचा नाश करण्यासाठी प्रकट झालो आहे आणि आता मी कोणालाही सोडणार नाही" असं भोले बाबा म्हणायचे. 

हाथरस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या ​​भोले बाबांचा ढोंगीपणा आता उघडकीस येत आहे. कासगंज येथील बाबाच्या आश्रमाबाहेर हातपंप बसवले आहेत. बाबांचे सेवक सांगत असत की बाबांच्या नावाने पाणी प्यायल्याने सर्व रोग बरे होतात. चमत्काराच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करायचे आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायचे. 

प्रायव्हेट आर्मी, डिझायनर कपडे; महागडे चष्मे, सोन्याचं घड्याळ; अशी आहे भोले बाबांची लाइफस्टाईल

भोले बाबांचा भला मोठा आश्रम आहे. आश्रमाचे सर्व दरवाजे बंद असतात आणि प्रत्येक दरवाजावर पहारा आहे. भोले बाबा जिथे जातात तिथे त्यांचा ताफा देखील असतो. ताफ्यामध्ये सुरुवातीला जवळपास २५ बाईक आणि त्यावर लोक बसलेले असतात. त्यानंतर महागड्या वाहनांचा ताफा येतो आणि नंतर ताफ्याच्या मागे आणखी वाहनं असतात.

​​भोले बाबांची जीवनशैली अशी आहे की, मोठ्या श्रीमंतानाही पाहून धक्का बसेल. कपड्यांसाठी देखील पर्सनल डिझायनर्सची फौज आहे. इतर धर्मगुरूंप्रमाणे अंगावर भगवे कपडे घालत नाही किंवा त्यांच्यासारखी जीवनशैलीही जगत नाही. याउलट बाबा अतिशय टिप टॉप स्टाईलमध्ये राहतात. आलिशान आणि आरामदायी जीवनशैली जगत आहेत. 
 

Web Title: hathras stampede narayan sarkar hari hypocrisy bhole baba old video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.