'त्या' हत्तिणीची होणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
By admin | Published: July 27, 2016 07:37 PM2016-07-27T19:37:38+5:302016-07-27T19:37:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेकांची नोंद झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. 27 - गेल्या काही दिवसांपासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेकांची नोंद झाली आहे. मात्र आता एक वयोवृद्ध हत्तीण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपूरममध्ये दक्षायणी नावाची 86 वर्षांची हत्तीण आहे. ती जगातील सर्वात जास्त आयुष्य जगणारी हत्तीण ठरणार आहे.
2003मध्ये 85 वर्षांचा हत्ती चीनमधल्या तैवानमध्ये मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर जगात सर्वाधिक जगणारी दक्षायणी हत्तीण असल्याची माहिती त्रावणकोर देवस्सम बोर्डनं दिली आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या माहितीनुसार ही हत्तीण त्रावणकोर देवस्सम बोर्डाच्या मालकीची आहे. या देवस्थानाकडे असणारी हत्तीण ही जगातील सगळ्यात वृद्ध हत्तीण असल्याचा दावा या बोर्डाने केला आहे. त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी, यासाठी या बोर्डाने पुढाकार घेतला आहे.
त्रावणकोरच्या राजघराण्याने या संस्थेला ही हत्तीण बहाल केली होती. केरळच्या अनेक सण आणि धार्मिक कार्यांमध्ये या हत्तिणीला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या या देवस्थानाकडे ३३ हत्ती आहेत. त्यापैकी दक्षयाणी ही सगळ्यात वृद्ध हत्तीण आहे. त्यामुळे तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घ्यावी, अशी आशा त्रावणकोर देवस्सम बोर्डनं व्यक्त केली आहे.