जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:08 PM2024-10-20T18:08:12+5:302024-10-20T18:08:38+5:30

भारताची लोकसंख्या वाढत असताना चंद्राबाबू नायडू यांनी हे अजब आवाहन केले आहे.

Have as many children as possible; Chandrababu Naidu's appeal to the people of the state | जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

Chandrababu Naidu Andhra Pradesh : भारताची वाढती लोकसंख्या पाहता केंद्र सरकार 'हम दो हमारे दो'चा सल्ला देत आहेत. पण, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. होय, हा विनोद नाही...चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील जनतेला अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहेत. राज्यातील मुलांच्या जन्मदरामुळे चंद्राबाबू नायडू चिंतेत आहेत. त्यामुळेच ते आता राज्यात लोकसंख्या व्यवस्थापनासाठी योजना आखत आहेत. या योजनेंतर्गत अधिक मुले जन्माला घालणाऱ्या पालकांना प्रशासनाकडून अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

चंद्राबाबूंची 'बच्चे बढाओ' योजना!
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सध्या राज्यातील वृद्धांची वाढती लोकसंख्या पाहता खूप चिंतेत आहेत. ही चिंता जाहीरपणे व्यक्त करताना ते शनिवारी म्हणाले की, राज्याचा लोकसंख्येचा समतोल ढासळत चालला आहे. अशा स्थितीत राज्य सरकार लोकसंख्या व्यवस्थापनासाठी नियोजन करत आहे. याअंतर्गत एक विधेयक आणण्याचाही विचार केला जात आहे, ज्यामध्ये अधिक मुले असलेल्या कुटुंबांना विशेष सुविधा देता येतील. एका कायद्याचाही विचार केला जात आहे, ज्या अंतर्गत दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारे लोकच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतील.

चंद्राबाबूंच्या चिंतेचे कारण काय?
चंद्राबाबू नायडू म्हणतात की, राज्यात वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे, राज्यातील तरुण परदेशात जाऊन स्थायिक होतात. अशा स्थितीत राज्यातील तरुणांची संख्या कमी होत आहे. यावर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आम्ही एकेकाळी 2 पेक्षा जास्त मुले होऊ नयेत, असा नियम केला होता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. म्हणूनच आम्ही तो नियम बदलला आहे. आता राज्याचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आम्ही अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहोत. 

उत्तर आणि दक्षिण राज्यांमधील लोकसंख्येची घणता 
दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात लोकसंख्येची घनता जास्त आहे. दक्षिण भारतातील नागरीकरणाचा दर उत्तर भारतापेक्षा जास्त आहे. याचे एक भौगोलिक कारण देखील आहे, कारण सुपीक जमीन, जलस्रोत आणि हवामान यासारख्या भौगोलिक घटकांचा उत्तर भारतातील लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव पडतो. तर, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी यासारख्या सामाजिक-आर्थिक घटकांचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. चंद्राबाबू नायडू यांनी दक्षिणेकडील राज्यांमधील घटत्या प्रजनन दरावरही चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, येथील प्रजनन दर 1.6 टक्के आहे, तर राष्ट्रीय दर 2.1 आहे, यावरून तुम्हाला परिस्थितीची कल्पना येऊ शकते. जर परिस्थिती अशीच राहिली, तर 2047 पर्यंत आपली वृद्ध लोकसंख्या लक्षणीय वाढेल.

Web Title: Have as many children as possible; Chandrababu Naidu's appeal to the people of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.