दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घातल्यास राज्य 'तरुण', चंद्राबाबूंनी तोडले तारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 03:49 PM2018-12-30T15:49:00+5:302018-12-30T15:49:12+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी एक हटके घोषणा केली आहे.
विजयवाडा- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी एक हटके घोषणा केली आहे. राज्यात दोनहून अधिक मुलांना जन्म दिल्यास त्या दाम्पत्याला इन्सेंटिव्ह देणार असल्याचं चंद्राबाबूंनी जाहीर केलं आहे. तसेच नायडू यांनी दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला घातल्यानं निवडणूक लढवता न येण्याची अटही शिथिल केली आहे. नायडू यांनी अशा प्रकारची घोषणा करून कुटुंब नियोजन पद्धतीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्यात गेल्या 10 वर्षांमध्ये 1.6 टक्के एवढी लोकसंख्येत घट झाली आहे. जेवढी तोंड खाणारी असतील त्यापेक्षा कमावते हात कमी पडतील, अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका, असंही आवाहनही चंद्राबाबूंनी जनतेला केलं आहे. राज्यातल्या लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही तरुण पिढीची आहे. राज्याला चिरतरुण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मुलं जन्माला घातली पाहिजेत, असंही ते म्हणाले आहेत.