शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्राध्यापिकेवर जबदरदस्ती, दोन प्राध्यापकांविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 09:19 PM2017-12-19T21:19:37+5:302017-12-19T21:24:31+5:30

येथील बिलासपुरमधील एका नामांकित कॉलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या कॉलेजमधील एका प्राध्यापिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने या कॉलेजमधील दोन प्राध्यापक आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे म्हटले आहे. 

To have physical relations, to face professors, crime against two professors | शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्राध्यापिकेवर जबदरदस्ती, दोन प्राध्यापकांविरोधात गुन्हा 

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्राध्यापिकेवर जबदरदस्ती, दोन प्राध्यापकांविरोधात गुन्हा 

googlenewsNext
ठळक मुद्देशारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्राध्यापिकेवर जबदरदस्तीकॉलेजमधील दोन प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखलआरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही

छत्तीसगड :  येथील बिलासपुरमधील एका नामांकित कॉलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या कॉलेजमधील एका प्राध्यापिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने या कॉलेजमधील दोन प्राध्यापक आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे म्हटले आहे. 
पीडित प्राध्यापिकेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी कॉलेजमधील दोन्ही प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुबीर सेन आणि दुर्गा शरण चंद्रा अशी या दोन प्राध्यापकांची नावे आहेत. या दोघांविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 34 आणि 345 ए  नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
गेल्या काही महिन्यापूर्वी पीडीत प्राध्यापिकेच्या पतीचे निधन झाले. यानंतर आरोपी सुबीर सेन आणि दुर्गा शरण चंद्रा यांनी या प्राध्यापिकेला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी अनेकदा त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, याप्रकरणी पीडितीने कॉंलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. मात्र, याकडे प्राचार्यांनी  कानाडोळा केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर या पीडितीने महिला हेल्पलाइन आणि विशाखा कमिटीकडे तक्रार केली. यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  
दरम्यान, पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचार्यांसह आणखी काहींची चौकशी सुरु असून याप्रकरणी जबाब नोंदविण्यात येत आहेत. तर, आरोपी सुबीर सेन आणि दुर्गा शरण चंद्रा यांनी आपल्यावर प्राध्यापिकेकडून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: To have physical relations, to face professors, crime against two professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा