तुम्ही तुम्ही कधी पाहिलीत का १० हजार रुपयांची नोट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 09:36 AM2024-06-23T09:36:46+5:302024-06-23T09:40:36+5:30

देशाच्या चलनाबद्दल अनेकांना कुतूहल असते.

Have you ever seen a 10 thousand rupees note | तुम्ही तुम्ही कधी पाहिलीत का १० हजार रुपयांची नोट ?

तुम्ही तुम्ही कधी पाहिलीत का १० हजार रुपयांची नोट ?

मनोज रमेश जोशी वृत्त संपादक

देशाच्या चलनाबद्दल अनेकांना कुतूहल असते. नोटा कशा तयार होतात, कधीं चलनात येतात तसेच या नोटांचे पुढे काय केले जाते, असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात असतात. भारतात सुमारे ३५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चलनात आहे चलनात असलेल्या नोटाची सर्वतोपरी जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बँकेवर अर्थात आरबीआयवर असते. या नोटांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया...  

रचना आणि मंजुरी
नव्या चलनी नोटांची रचना आरबीआयतर्फे करण्यात येते. त्यात एकूण सुरक्षाविषयक बाबींचा विचार आरबीआय करते. त्यानंतर केंद्र सरकार नव्या नोटांच्या रचनेला मंजुरी देते.

नोटांची छपाई
नोटांच्या रचनेला सरकारने मंजुरी दिल्यानंतर छपाईची प्रक्रिया सुरू होते. नोटांची छपाई सरकार करते. सरकारी मालकीच्या सिक्युरीटी प्रिटिंग अँड मिटिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या मुद्रणालयात नोटा छापल्या जातात. 

नोटांचा वापर
बँकामधून नोटा लोकांच्या हाती येतात. थेट बँका किंवा एटीएममधून  ग्राहकांना नोटा मिळतात आणि त्यांचा दररोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापर होतो.

आरबीआयकडे वापसी
नोटा जेव्हा जुन्या किंवा खराब होतात तेव्हा त्या लोकांकडून बँकामधून परत केल्या जातात. चलनी नोटा चलनातून बाद केल्यास अशा नोटा बँकांमधून या नोटा आरबीआयकडे परत पाठविल्या जातात. 

वितरण
नोटांची छपाई झाल्यानंतर त्या वितरणासाठी पाठविण्यात येतात. ही प्रक्रिया आरबीआयच्या नियंत्रणाखाली पार पडते.

...अशी आहे वितरणाची प्रक्रिया
आरबीआयची विविध ठिकाणी इश्यू ऑफिसेस आहेत. सर्वप्रथम नव्या नोटा तेथे पाठविण्यात येतात. या कार्यालयातून नोटा करंसी चेस्ट येथे पाठविल्या जातात.
करंसी चेस्ट म्हणजे एक प्रकारे नोटा आणि नाणी साठविण्याचे केंद्र. आरबीआयच्या अखत्यारितच त्यांचे काम चालते. करंसी चेस्टमधून त्यांच्या परिक्षेत्रातील बँकांना येथूनच नोटा आणि नाण्यांचे वितरण करण्यात येते. सरकारी किंवा खासगी बँकांना येथून नोटा पाठविण्यात येतात.

काही रंजक माहिती 
भारतात चार ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. महाराष्ट्रात नाशिक, मध्य प्रदेशातातील देवास, कर्नाटकमध्ये म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये सालबोनी. १९१७ मध्ये एक रूपयाची नोट चलनात, मात्र, या नोटेची छपाई इंग्लंडमध्ये झाली. 

  • १८६१ - १० रूपयांची चलनी नोट छापण्यात आली. ब्रिटिश राजवटीखालील भारत सरकारने छपाई केली.
  • १८९९ - १० हजार रूपयांचीही नोट ब्रिटिश राजवटीत १८९९ मध्ये चलनात आली होती. 
  • १९०० - १०० रूपयांची नोट १९०० मध्ये
  • १९०५ - ५० रूपयांची नोट छापली होती. 
  • १९०७ - ५०० रूपयांची नोट छापली होती.
  • १९०९ - १ हजार रूपयांची नोट छापली होती.
  • १९२८ - १९२८ मध्ये नाशिक येथे मुद्रणालय सुरू झाले. 

Web Title: Have you ever seen a 10 thousand rupees note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.