उत्तरेत धुक्याचा कहर; नवी दिल्लीत रेड अलर्ट, ११० विमानांना लेटमार्क, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:43 AM2023-12-28T07:43:34+5:302023-12-28T07:43:50+5:30
वाहने एकमेकांवर आदळून ८ ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): राजधानी नवी दिल्लीत धुक्यामुळे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. दिल्ली विमानतळावर ११० विमानांना उशीर झाला, तर चार उड्डाणे वळवण्यात आली आहेत.
दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत नऊ रस्ते अपघात झाले. त्यात ५५ वाहनांची धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झाले आहेत. रेल्वे वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आहे.
कुठे झालेत अपघात?
- आग्रा-फिरोजाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी १५ वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, सहा जखमी
- दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गावर २५ वाहने आदळून पाच जण जखमी
- आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर सहा वाहने एकमेकांवर आदळून एकाचा मृत्यू झाला, तर १६ जखमी झाले.
- बागपत येथे मिनी बस-ट्रकच्या झालेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू
- राजस्थानच्या भरतपूरमध्ये बस आणि ऑटोच्या धडकेत दोघांचा मृत्यू
- हनुमानगड येथे बस-जीप धडकेत एकाचा मृत्यू झाला.