हॉकर्स प्रतिनिधींनी घातला आयुक्तांशी वाद बी.जे.मार्केटमधील प्रकार: भास्कर मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ ; सानेगुरुजी रुग्णालयाची जागा द्या

By admin | Published: August 31, 2016 09:44 PM2016-08-31T21:44:16+5:302016-08-31T21:44:16+5:30

जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत व्यवसायास अडचणी येतात, ग्राहक येत नाहीत त्यामुळे आम्हाला ही जागा नको अशी भूमिका मांडत हॉकर्स प्रतिनिधींनी मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याशी बुधवारी मांडला. बी.जे.मार्केटमध्ये यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.

Hawker's Representative Contributed to Commissioner, Type in BJ Market: Text of Vendors at Bhaskar Market; Give place to Sanane Guruji Hospital | हॉकर्स प्रतिनिधींनी घातला आयुक्तांशी वाद बी.जे.मार्केटमधील प्रकार: भास्कर मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ ; सानेगुरुजी रुग्णालयाची जागा द्या

हॉकर्स प्रतिनिधींनी घातला आयुक्तांशी वाद बी.जे.मार्केटमधील प्रकार: भास्कर मार्केटकडे विक्रेत्यांची पाठ ; सानेगुरुजी रुग्णालयाची जागा द्या

Next
गाव : न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत व्यवसायास अडचणी येतात, ग्राहक येत नाहीत त्यामुळे आम्हाला ही जागा नको अशी भूमिका मांडत हॉकर्स प्रतिनिधींनी मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याशी बुधवारी मांडला. बी.जे.मार्केटमध्ये यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
स्थलांतर करण्यात आलेल्या विविध भागांना मनपा आयुक्त जीवन सोनवणे व अन्य अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून भेट देत आहेत. बुधवारी सुभाष चौक ते घाणेकर चौक भागातून न्यू बी.जे. मार्केट व भास्कर मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात आलेल्या हॉकर्सची भेट घेण्यासाठी आयुक्त जीवन सोनवणे सर्व विभाग प्रमुखांसह ११ वाजता न्यू बी.जे. मार्केटमध्ये गेले होते.
सुुभाष चौकात या
हॉकर्सशी चर्चेसाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी सुभाष चौकात यावे अशी भूमिका हॉकर्स प्रतिनिधींनी घेतली होती. मात्र आयुक्तांनी नकार दिल्यानंतर काही वेळ वाट पाहून हॉकर्स न्यू बी. जे.मार्केटमध्ये पोहोचले. हॉकर्स प्रतिनिधी होनाजी चव्हाण, बाळू बाविस्कर यांनी आयुक्तांना न्यू बी.जे. मार्केटमध्ये व्यवसायास येणार्‍या अडचणींची माहिती दिली. येथे ग्राहक येत नसल्याने व्यवसायांवर परिणाम होत असल्याची भूमिका मांडत आम्हाला ही जागा नको असे सांगितले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत बाजारासाठी पर्याय मान्य नसेल तर दुसर्‍या पर्यायाचा विचार केला जाईल असे आयुक्तांनीच सांगितले होते. बी.जे. मार्केटची ही जागा बाजारपेठेसाठी योग्य नसल्याने आम्हाला पर्यायी जागा द्या अशी मागणी उपस्थित हॉकर्स व प्रतिनिधी करत होते.
दुसर्‍या पर्यायाला नकार
न्यू बी.जे. मार्केटची ही जागा सायलेंट झोनमध्ये येते तसेच तेथील दुकान व्यावसायिकांचेही व्यवसाय चालत नसल्याने आम्हाला बळजबळी बसविण्यामागची भूमिका काय असे हॉकर्स वारंवार आयुक्तांना सांगत होते. त्या ऐवजी आम्हाला इमारत पाडलेल्या सानेगुरुजी रुग्णालयाची रिकामी जागा देण्यात यावी अशी मागणी हॉकर्सने केली मात्र आयुक्तांनी त्यास स्पष्ट नकार दिला. जागा बदलवून देण्याचे अधिकार आपले नाहीत. अर्ज द्या महासभेत तो ठेवला जाईल अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी मांडली.

Web Title: Hawker's Representative Contributed to Commissioner, Type in BJ Market: Text of Vendors at Bhaskar Market; Give place to Sanane Guruji Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.