हॉकर्सने लावल्या गाड्या : जिल्हा न्यायालयात सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यालयाचे निर्देश शिवाजीरोडवर पुन्हा अतिक्रमणे

By admin | Published: March 22, 2016 12:40 AM2016-03-22T00:40:55+5:302016-03-22T00:40:55+5:30

जळगाव : शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाले विक्री करणार्‍या हॉकर्सचे या भागात तब्बल १२ दिवसांनी पुन्हा अतिक्रमण झाले. सोमवारी या ठिकाणी पुन्हा गाड्या लावल्या. न्यालयाने मनपाच्या कारवाईस स्थगिती दिली अशी माहिती हॉकर्सला मिळाल्याने या ठिकाणी गाड्या लागल्या होत्या. कारवाईस गेलेल्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सची समजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्याने आता मंगळवारी न्यायालयाचे पत्र शहर पोलिसांना सादर करून मंगळवारी या भागात अतिक्रमणे केली केल्यास पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे.

Hawkers' trains: High court orders to decide six weeks in court again to encroach on Shivajirod | हॉकर्सने लावल्या गाड्या : जिल्हा न्यायालयात सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यालयाचे निर्देश शिवाजीरोडवर पुन्हा अतिक्रमणे

हॉकर्सने लावल्या गाड्या : जिल्हा न्यायालयात सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यालयाचे निर्देश शिवाजीरोडवर पुन्हा अतिक्रमणे

Next
गाव : शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाले विक्री करणार्‍या हॉकर्सचे या भागात तब्बल १२ दिवसांनी पुन्हा अतिक्रमण झाले. सोमवारी या ठिकाणी पुन्हा गाड्या लावल्या. न्यालयाने मनपाच्या कारवाईस स्थगिती दिली अशी माहिती हॉकर्सला मिळाल्याने या ठिकाणी गाड्या लागल्या होत्या. कारवाईस गेलेल्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सची समजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्याने आता मंगळवारी न्यायालयाचे पत्र शहर पोलिसांना सादर करून मंगळवारी या भागात अतिक्रमणे केली केल्यास पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे.
गेल्या ८ रोजी जिल्हा न्यायालयात दाखल अर्ज फेटाळला गेल्याने मनपा अतिक्रमण विभागाने शिवाजीरोडवरील हॉकर्सच्या स्थलांतराची कारवाई सुरू केली होती. स्वत: आयुक्तांनी या ठिकाणी भेट देऊन अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. हॉकर्सनी स्वत:हून गाड्या काढून घेण्याची तयारीही दर्शविली. त्यानुसार तासाभरात या रस्त्यावरील सर्व हॉकर्सचे अतिक्रमण निघून रस्ता मोकळा झाला.
सामंजस्याने समाधान
शिवाजीरोड भागातील बहुतांश अतिक्रमण अतिशय जुने होते. संपूर्ण रस्त्यावर अतिक्रमण असल्याने या भागातून वाहन नेणे- आणणे म्हणजे कसरत होती. हॉकर्स तसेच व्यापार्‍यांचेही या भागात १० ते १५ फूट अतिक्रमण होते. मात्र सर्वांनीच सामंजस्य दाखविल्याने हा रस्ता मोकळा झाला होता. शंभर वर्षरपूर्वीची अतिक्रमणे निघाल्याने व्यापारी, हॉकर्सच्या भूमिकेचे व मनपातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेचे शहरात उस्फूर्त स्वागत झाले होते व समाधानही व्यक्त होत होते.
निर्णयाबाबतच्या संभ्रमाने गोंधळ
जिल्हा न्यायालयाने मनपाच्या कारवाईस स्थगिती न दिल्याने हॉकर्सने मुंबईत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली होती. न्या. एस.पी. देशमुख यांच्यापुढे हा अर्ज होता. जिल्हा न्यायालयाने हॉकर्सला स्थगिती न दिल्याने महापालिकेने सर्वोच्च न्यालयाच्या निर्देशानुसार शिवाजीरोडवरील अतिक्रमणे काढली असल्याचे महापालिकेचे वकील ॲड. विश्वंभर गुणाले यांनी न्यालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यालयाने मनपाने केलेल्या कारवाईनंतरची जैसे थे परिस्थिती ठेवावी असे निर्देश दिले. मात्र जैसे थे परिस्थितीचा अर्थ हॉकर्सने आपल्या बाजुने निर्णय लागल्याचा घेऊन या ठिकाणी पुन्हा गाड्या लावल्या. त्यामुळे हा रस्ता तब्बल १२ दिवसांनंतर पुन्हा हॉकर्सने वेढला गेला होता. फळ विक्रेते व मसाल्याचे साहित्य विक्री करणार्‍यांच्या गाड्या या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत होत्या.

Web Title: Hawkers' trains: High court orders to decide six weeks in court again to encroach on Shivajirod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.