५० वर्षात आलेे हजारावर उद्योग चटई उद्योगांचे वर्चस्व: दाळ उद्योगांचीही भरारी; ४० हजार हातांना मिळाले काम

By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:56+5:302016-02-02T00:15:56+5:30

(एमआयडीसी-१)चंद्रशेखरजोशी/जळगाव : जळगाव औद्योगिक क्षेत्रात गेल्या ५० वर्षात एक हजारावर उद्योग आले. काही उद्योगांनी काढता पाय घेतला तर काहींची भरभराट या औद्योगिक क्षेत्रात झाल्याचे लक्षात येते. जळगाव औद्योगिक क्षेत्राची स्थापना १९७५ मध्ये झाली. औद्योगिक विकासाची फारशी गती नसली तरी थोड्या नव्हे तर तब्बल ४० हजार हाताना काम शहरातील औद्यागिक क्षेत्राने दिले आहे.

Hazaras dominate 50 years of industry; 40 thousand hands got the work | ५० वर्षात आलेे हजारावर उद्योग चटई उद्योगांचे वर्चस्व: दाळ उद्योगांचीही भरारी; ४० हजार हातांना मिळाले काम

५० वर्षात आलेे हजारावर उद्योग चटई उद्योगांचे वर्चस्व: दाळ उद्योगांचीही भरारी; ४० हजार हातांना मिळाले काम

googlenewsNext
(ए
मआयडीसी-१)चंद्रशेखरजोशी/जळगाव : जळगाव औद्योगिक क्षेत्रात गेल्या ५० वर्षात एक हजारावर उद्योग आले. काही उद्योगांनी काढता पाय घेतला तर काहींची भरभराट या औद्योगिक क्षेत्रात झाल्याचे लक्षात येते. जळगाव औद्योगिक क्षेत्राची स्थापना १९७५ मध्ये झाली. औद्योगिक विकासाची फारशी गती नसली तरी थोड्या नव्हे तर तब्बल ४० हजार हाताना काम शहरातील औद्यागिक क्षेत्राने दिले आहे.
औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीत त्या भागातील काही बाबी या महत्त्वाच्या ठरत असतात. यात पाणीच्या व्यवस्था, त्या भागातील दळणवळणाची साधने, विजेचा पुरवठ्याची स्थिती आदी बाबी प्रामुख्याने उद्योजक मंडळी पहात असतात. यावरून उद्योग सुरू करण्याबाबतचे निर्णय होतात. जळगाव औद्योगिक क्षेत्राचा विचार करता या सर्व बाबींची उपलब्धता या क्षेत्रात मुबलक प्रमाणात असल्याचेच लक्षात येते. हे क्षेत्र गेल्या काही वर्षात वाढत असल्याचे लक्षात येते. परिणामी आजही या क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी जवळपास एक हजार उद्योजकांचे नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असून तसे अर्ज प्रशासनाकडे आहेत.
प्रमुख उद्योग
जळगाव शहराच्या औद्योगिक क्षेत्राला नावारूपाला आणणार्‍या उद्योगांमध्ये जैन उद्योग समुह, रेमंड, सुप्रीम, फाउंडेशन ब्रेक्स म्यॅनिफॅˆरींग लिमिटेड, एम.को. कंपनी लिमिटेड, लिग्रांड लिमिटेड, मेरिको इंडस्ट्री, अशा काही मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. या प्रत्येक उद्योगात हजारो कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सुप्रीम इंडस्ट्रीने गाडेगावनजीक आपल्या एमआयडीसीतील उद्योगाचे विस्तारीकरण केले आहे.
५० वर्षांची परंपरा
लघु उद्योजकांची साखळी जळगाव एमआयडीसीत फार मोठी आहे. १९७५ मध्ये जळगावच्या औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. एमआयडीसीत पहिला प्लॉट के. के. कॅन्सचे संस्थापक रजनिकांत कोठारी यांना मिळाला. यानंतर हळू हळू या क्षेत्राचा विकास होत गेला. सद्य स्थितीत लहान,मोठे मिळून १२५९ उद्योगांची श्रुंखला या क्षेत्राचा लौकीक टिकवून आहे. बहुतांश उद्योगांमध्ये तीन पाळ्यांमध्ये कामगार वर्ग हा काम पहातो. थोड्या नव्हे तर जवळपास ४० हजार हातांना या क्षेत्रातील उद्योगांमध्ये काम मिळालेले आहे. या परिसराचे क्षेत्र सुमारे ६४८.३१ हेक्टर एवढे आहे. त्यात विविध सेक्टरमध्ये उद्योगांचा विस्तार दिसून येतो.
------
लास्टिक, दाळ उद्योगांची भरारी
जळगाव औद्योगिक क्षेत्राची एक वेगळी ओळख प्लास्टिक उद्योगाने निर्माण केली असल्याचे लक्षात येते. औद्योगिक क्षेत्रात जवळपास ६०० उद्योग हे प्लास्टिकपासून निर्मिती होणार्‍या विविध वस्तूंचे उत्पादन घेतात. यात प्रामख्याने पाईप निर्मिती उद्योग व चटई निर्मिती उद्योगाचा समावेश आहे. चटई उद्योगाने विदेशातही आपल्या उत्पादनांचा ठसा उमटविला आहे. दुबईसह विविध देशांमध्ये या क्षेत्रातून चटईंची निर्यात होते. एमआयडीसीत जवळपास ८० डाळ निर्मिती उद्योग आहे. अडचणींवर मात करत हे उद्योग तगधरुन आहेत. निर्यातक्षम डाळींचे उत्पादन औद्योगिक क्षेत्रात घेतले जाते.
-----
हे उद्योग झाले बंद
शहरातील एमआयडीसीतून काही उद्योगांनी काढता पाय घेतला. यात प्रामुख्याने व्हीआयपी, हिंदुस्थान फेराइड्स, एजीएस केमीकलतसेच मफतलाल ग्रुपनेही जळगावात जागा घेतली होती मात्र कंपनी सुरू झालीनाही. यात औद्योगिक समस्या, कामगारांचे आंदोलन, नुकसानीमुळे काहींनी उद्योग बंद केले. क्रमश:
-------

Web Title: Hazaras dominate 50 years of industry; 40 thousand hands got the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.