राजकारणात जाण्याच्या अफवांचे हरभजनने केले खंडन
By admin | Published: December 22, 2016 03:44 PM2016-12-22T15:44:18+5:302016-12-22T16:15:49+5:30
भारताचा क्रिकेटर हरभजन सिंग आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना ऊत आले होते. मात्र, यावर अखेर स्वत: हरभजनने पडदा पाडला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - भारताचा क्रिकेटर हरभजन सिंग राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना ऊत आले होते. मात्र, यावर स्वत: हरभजन सिंहने पडदा पाडला आहे.
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंह कॉंग्रेस पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या सर्वत्र चर्चा होत्या. मात्र हरभजन सिंहने यावर ट्विटरवरुन सांगितले की, अद्याप मी राजकरणात येण्याचा विचार केला नाही. त्यामुळे याबाबत कोणत्याही अफवा पसरु नका.
गेल्या दोन दिवसांपूर्वी हरभजन सिंह कॉंग्रेस पार्टीत प्रवेश करणार असून पंजाब विधानसभेसाठी जालंधर मतदार संघातून निवडणूक लढणार आहे, अशा चर्चा सुरु होत्या. तसेच, हरभजनसोबत नवज्योत सिंह सिधू सुद्धा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, याबाबत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचा अफवा सुद्धा पसरल्या होत्या.
I have no intentions of joining politics any time soon. Please stop spreading rumors.
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) 22 December 2016