तर मनपाला हुडकोकडून मिळणार ३६ कोटी दावा: २२ रोजी डीआरएटीमध्ये होणार सुनावणी

By admin | Published: November 7, 2016 10:51 PM2016-11-07T22:51:34+5:302016-11-07T22:51:34+5:30

जळगाव: मनपाच्या हुडको कर्ज थकबाकीप्रकरणी डीआरटीने (डेबीट रिकव्हरी ट्रीब्युनल) एकतर्फी केलेल्या डिक्रीआदेशांविरोधात मनपाने डीआरएटीकडे (डेबीट रिकव्हरी अपिलेट ट्रीब्युनल)दाखल केलेल्या दाव्यात २२ रोजी सुनावणी होणार आहे. त्यात मनपाकडून हुडकोच्या कर्जाची परतफेड वर्षभरापूर्वीच झाली असल्याचा मुद्दा आकडेवारीसह मांडला जाणार आहे. मनपाची बाजू ग्रा‘ ठरल्यास प्रसंगी मनपाला हुडकोकडून ३६ कोटी परत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

HC issues 36 crores claims: Hearing on DRA's hearing on 22 | तर मनपाला हुडकोकडून मिळणार ३६ कोटी दावा: २२ रोजी डीआरएटीमध्ये होणार सुनावणी

तर मनपाला हुडकोकडून मिळणार ३६ कोटी दावा: २२ रोजी डीआरएटीमध्ये होणार सुनावणी

Next
गाव: मनपाच्या हुडको कर्ज थकबाकीप्रकरणी डीआरटीने (डेबीट रिकव्हरी ट्रीब्युनल) एकतर्फी केलेल्या डिक्रीआदेशांविरोधात मनपाने डीआरएटीकडे (डेबीट रिकव्हरी अपिलेट ट्रीब्युनल)दाखल केलेल्या दाव्यात २२ रोजी सुनावणी होणार आहे. त्यात मनपाकडून हुडकोच्या कर्जाची परतफेड वर्षभरापूर्वीच झाली असल्याचा मुद्दा आकडेवारीसह मांडला जाणार आहे. मनपाची बाजू ग्रा‘ ठरल्यास प्रसंगी मनपाला हुडकोकडून ३६ कोटी परत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी हुडकोने डीआरटीत दावा दाखल केला असून त्यात डीआरटीने एकतर्फी ३४१ कोटींचे डिक्री आदेश पारित केले आहेत. मनपाने याविरोधात डीआरएटीत अपिल केले आहे. दरम्यान मनपाच्या सनदी लेखापालांनी मनपाचे कर्ज सुमारे १ वर्षभरापूर्वीच फिटले असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध करून दाखविले आहे. ही बाब आता २२ रोजी डीआरएटीमध्ये मांडली जाणार आहे. तसेच डीआरटीने मनपाचे वकील उपस्थित नसताना व ॲड.केतन ढाके यांचा डीआरटी कोर्टातील कामकाजाशी संबंध नसताना ते उपस्थित असल्याचे खोटे दर्शवून एकतर्फी डिक्री आदेश पारीत केल्याचा मुद्याही मांडला जाणार आहे. त्यासाठी ॲड.ढाके यांच्याकडूनही लेखी म्हणणे सादर केले जाणार आहे. त्यामुळे डीआरएटीत मनपाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच २४ रोजी डीआरटी कामकाज होणार आहे.

Web Title: HC issues 36 crores claims: Hearing on DRA's hearing on 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.