सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 05:23 PM2021-03-15T17:23:52+5:302021-03-15T17:27:34+5:30
HD Kumaraswamy On Boundary Issue : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी, बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहे, असा सवाल केला आहे.
बेंगळुरू : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अलीकडेच शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या वाहनावर केलेला हल्ला आणि याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात कर्नाटकातील बसेसना घातलेली बंदी, अशातच आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहे, असा सवाल केला आहे. ( hd kumaraswamy asked why are maharashtra people unnecessarily interfering into boundary issue)
बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं आवश्यकता नसताना हस्तक्षेप का करीत आहेत? हा मुद्दा फार पूर्वीपासून होता. सामान्य लोकांना त्रास होत आहे. आमचे राज्य सरकार पंतप्रधानांचं नाव हस्तक्षेप करण्यासाठी का आणत आहे? माझ्या म्हणण्यानुसार कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
Why are Maharashtra people unnecessarily interfering into boundary issue (Belagavi)?Issue was over long back. Common people are facing trouble. Why is our state govt bringing PM's name to interfere? Nobody can interfere according to me: Ex Karnataka CM & JDS leader HD Kumaraswamy pic.twitter.com/PLs0ZyIYEX
— ANI (@ANI) March 15, 2021
संजय राऊत यांचा मोदी आणि शहांवर हल्लाबोल
बेळगावमध्ये कर्नाटक भाजपाप्रणित एक संघटना आहे, ते आमच्या मराठी लोकांवर ज्याप्रकारे हल्ले करत आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. भाजपाला किंवा केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार सुरू आहे, असे ते म्हणत आहेत, त्याबद्दल त्यांना खूप चिंता आहे. परंतु, बेळगावमध्ये आठ दिवसांपासून आमच्या लोकांवर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहेत, खुनी खेळ सुरू आहे. त्याबाबत भाजपचा कोणताही वरिष्ठ नेता, केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधान काहीच बोलत नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले होते.
काँग्रेस महात्मा गांधींच्या नाही, तर जिनांच्या मार्गावर जातोय; शिवराज सिंह चौहान यांची टीका
दरम्यान, अलीकडेच बेळगाव येथील कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. एवढंच नाहीतर गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, गाडीवरील भगव्या फलकास काळे फासण्याचाही प्रयत्न झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. यावर प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. या एकंदरीत घडामोडींनंतर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.