त्याने मागितला राजीनामा, मोदींनी दिलं स्माईल
By admin | Published: April 8, 2017 05:06 PM2017-04-08T17:06:33+5:302017-04-08T17:09:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना कार्यक्रमाचं निवेदन करणा-याने पायउतार होण्यास सांगितलं आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना कार्यक्रमाचं निवेदन करणा-याने पायउतार होण्यास सांगितलं आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. शनिवारी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये भारत दौ-यावर असलेल्या शेख हसीना यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संयुक्त निवेदन पार पडलं. यावेळी निवेदकाने असं काही म्हटलं की पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्यासह उपस्थित सर्वजणांना हसू आवरलं नाही.
झालं असं की, दोन्ही नेत्यांची भाषणं जेव्हा संपली तेव्हा निवेदन करणारा अधिकारी म्हणाला की, "आय रिक्वेस्ट द टू प्राईम मिनिस्टर टू स्टेप डाऊन". त्यांना म्हणायचं होतं की दोन्ही नेत्यांनी मंचावरुन खाली उतरावं. पण इंग्लिशमध्ये "स्टेप डाऊन"चा अर्थ आपलं पद सोडणं असं असतो. त्यामुळे जेव्हा निवेदकाने मोदींना "स्टेप डाऊन" होण्यास म्हणजेच पद सोडण्यास सांगितलं तेव्हा सर्वजणांनी हसायला सुरुवात केली. स्वत: मोदी आणि शेख हसीना यांनादेखील आपलं हसू आवरलं नाही.
#WATCH: This funny moment happened live at Hyderabad House during PM Modi and Bangladesh PM Sheikh Hasina"s joint statement. pic.twitter.com/Z1D7AbB3eb
— ANI (@ANI_news) April 8, 2017