पत्नीला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी त्याने ४१८ कोटींना खरेदी केलं संपूर्ण बेट, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:12 PM2024-09-26T13:12:04+5:302024-09-26T13:13:01+5:30
Husband Gift Private Island For Wife:माझ्या अब्जाधीश पतीने मला बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील एका गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
माझ्या अब्जाधीश पतीने मला बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील एका गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्याखाली लिहिलंय की, ‘’POV: तुला बिकिनी घालायची होती, म्हणून तुझ्या कोट्यधीश पतीने तुझ्यासाठी एक बेट खरेदी केलंय’’.
२६ वर्षांची सौदी अल नदाक ही दुबईतील व्यावसायिक जमाल अल नदाक याची पत्नी आहे. ती मुळची ब्रिटिश आहे. ती स्वत:ची ओळख पूर्णवेळ गृहिणी अशी करून देते. या उच्चभ्रू जोडप्याची ओळख दुबईत शिक्षण घेताना झाली होती. तसेच तीन वर्षांपूर्वी त्यांनी विवाह केला होता. अतिश्रीमंत गृहिणी असण्याबरोबरच सौदी ही एक इंफ्लुएंसर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या इन्स्टा आणि टिकटॉक अकाउंटवरून तिची हायप्रोफाइल लाईफस्टाइल दिसत असते.
सौदी अल नदाक हिने तिला पतीने भेट म्हणून दिलेल्या बेटाचा बनवलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत २४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सौदी हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,माझा पती गुंतवणुकीसाठी एक बेट खरेदी करण्याचा विचार करत होता. तसेच बीचवर मला सुरक्षित वाटावं, अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे त्याने हे बेट खरेदी केलं.
दरम्यान, सुरक्षा आणि खाजगीपणा जपण्यासाठी सौदी हिने या बेटाचं खरं ठिकाण गुप्त ठेवलं आहे. मात्र तिचा पती जमाल याने हे बेट सुमारे ५० दशलक्ष डॉलर (४१८ कोटी रुपये) एवढ्या किमतीला खरेदी केल्याचे म्हटले आहे.