त्यांनी खूप दिले, आम्ही किती घेतले?
By admin | Published: July 28, 2015 05:31 AM2015-07-28T05:31:49+5:302015-07-28T05:31:49+5:30
आयुष्यात कोणतीही खटपट न करता ते या पदावर पोचले होते. त्यांच्या जीवनात विक्रम साराभाई किंवा मेनन यांच्यासारख्यांनी केलेली वैचारिक क्रांती जाणून घेण्यासाठी त्यांचे ‘विंंग्ज आॅफ फायर’
आयुष्यात कोणतीही खटपट न करता ते या पदावर पोचले होते. त्यांच्या जीवनात विक्रम साराभाई किंवा मेनन यांच्यासारख्यांनी केलेली वैचारिक क्रांती जाणून घेण्यासाठी त्यांचे ‘विंंग्ज आॅफ फायर’ हे आत्मचरित्रच वाचायला हवे. त्यात ते एके ठिकाणी लिहितात, ‘‘काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावलं उमटवायची असतील
तर ती फरफटू नका.’’ आणखी एके ठिकाणी ते लिहितात, ‘‘येणाऱ्या दिवसांसाठी तयारीत
राहा. त्यांना सारखेच सामोरे जा. जेव्हा ऐरण
होशील तेव्हा घाव सोस अन् हातोडा होशील
तेव्हा घाव घाल!’’
२६ जानेवारी २००३ रोजी गणराज्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी भारताला विकसित राष्ट्र करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, ‘‘शिक्षणामुळे विद्यार्थ्यांतील उपक्रमशीलता समोर यायला हवी. उपक्रमशीलतेने ज्ञान मिळते आणि ज्ञान ही राष्ट्राची संपत्ती असते. ग्रामीण भागाशी चार तऱ्हेने संपर्क साधण्यातच मुक्ती आहे. हा संपर्क रस्त्यांच्या द्वारा, दूरसंचार यंत्रणेद्वारा, प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि आर्थिक प्रगतीतून साध्य होईल. त्यासाठी नागरिकांचा देशाच्या उभारणीत कृतिशील सहभाग असायला हवा.
राष्ट्राकडून काही मिळविण्याची अपेक्षा न बाळगता राष्ट्राला काहीतरी देण्याची वृत्ती बाळगावी!’’ नवी दिल्ली येथे एप्रिल २००५ मध्ये झालेल्या इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या सेमिनारमध्ये भाषण करताना ए.पी.जे. कलाम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानात करिअर करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी पुढील उपाययोजना सुचविली. ते म्हणाले, ‘‘विज्ञानाशी बांधिलकी असणाऱ्या उच्च दर्जाच्या विद्यार्थ्यांना विज्ञानात करिअर करण्याची खात्री असावी यासाठी दरवर्षी एम.एस्सी. केलेले ३०० विद्यार्थी आणि डॉक्टरेट केलेले १०० विद्यार्थी यांना इस्रो, डी.आर.डी.ओ.,
अॅटॉमिक एनर्जी, सी.एस.आय.आर., डी.एस.टी. आणि विभिन्न विद्यापीठे यांच्यात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
- झांझीदार येथील भाषणातून(पुनर्मुद्रित).