अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 08:57 PM2019-01-13T20:57:52+5:302019-01-13T20:59:27+5:30

भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली होती.

He has betrayed the country for pornographic photos and only for five thousand rupees | अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी 

अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी 

ठळक मुद्देभारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली सोमवीर असे या जवानाचे नाव आहेकेवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानाने देशाशी गद्दारी केल्याचे उघड

जयपूर - भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली होती. सोमवीर असे या जवानाचे नाव असून, त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानाने देशाशी गद्दारी केल्याचे उघड झाले आहे.
 
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरवणाऱ्या या हनिट्रॅपच्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. हाय हॅलोच्या माध्यमातून जवान सोमवीर आणि पाकिस्तानी महिला एजंटमध्ये चर्चेला सुरुवात झाली होती. या महिलेने सोमवीरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही अश्लील छायाचित्रे पाठवली होती. त्याबदल्यात या जवानाने  लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती  या महिलेला पुरवली. यानंतर या महिलेने त्याला पाच हजार रुपयेही दिले. दरम्यान, या प्रकरणाल लष्कराचे 50 जवान तपास यंत्रणांच्या रडावर असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे. 

 दरम्यान, महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानानं व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित जवानाला आज अटक करण्यात आली होती. या जवानाला आता चौकशीसाठी जयपूरला आणण्यात आले आहे.    

राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्र यांनी या माहितीला दुजोरा दिला. सोमवीर नावाच्या जवानाला शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्याला जयपूरला आणण्यात आलं. सध्या त्याची पोलीस चौकशी सुरू आहे. सोमवीर सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचं एक विशेष पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याच्यावर नजर ठेवून होते.  

पाकिस्तानमधील एका महिलेनं जवानाला हनी ट्रॅप केल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांनी मिळाली होती. सोमवीर या महिलेला सैन्याशी संबंधित गुप्त माहिती पुरवत होता. सोमवीर या महिलेला प्रशिक्षणादरम्यान भेटल्याची माहिती चौकशीतून समोर आली. जसलमेरमध्ये तैनात झाल्यावर सोमवीरनं संबंधित महिलेला संवेदनशील माहिती व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दिल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच सोमवीरवर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. 

Web Title: He has betrayed the country for pornographic photos and only for five thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.