पत्नी सोडून गेली म्हणून 'त्याने' तीन जिल्ह्यातील वीज पुरवठा केला खंडीत
By admin | Published: May 25, 2016 01:34 PM2016-05-25T13:34:58+5:302016-05-25T13:41:19+5:30
संसाराच्या मध्यावर पत्नी साथ सोडून निघून गेली तर, अनेकांना ते दु:ख पचवणे जड जाते. काहीजण त्या दु:खावर मात करुन पुन्हा आयुष्यात उभे रहातात.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २५ - संसाराच्या मध्यावर पत्नी साथ सोडून निघून गेली तर, अनेकांना ते दु:ख पचवणे जड जाते. काहीजण त्या दु:खावर मात करुन पुन्हा आयुष्यात उभे रहातात तर, काही जण टोकाचे पाऊल उचलतात. उत्तप्रदेशमध्ये रहाणा-या रामप्रसादने पत्नी सोडून गेल्यामुळे एकदम विचित्र कृती केली ज्यामुळे तीन जिल्ह्यात सहा तास वीज पुरवठा खंडीत झाला होता.
कौटुंबिक वादातून रामप्रसादची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामुळे निराश झालेला रामप्रसाद थेट इलेक्ट्रीकच्या पोलवर जाऊन चढला त्यामुळे उत्तरप्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्य तब्बल सहातास वीजपुरवठा खंडीत झाला होता. सोमवारी सकाळी उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना घडली.
हताश रामप्रसाद सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास असफाबाद गावातील १.३५ लाख व्होल्ट क्षमतेच्या वीजेच्या खांबावर जाऊन चढला. तो पोलिसांना पत्नीला शोधून आणण्यास सांगत होता. तुम्ही माझ्या पत्नीला शोधून आणा अन्यथा खांबावरुन उडी मारुन जीव देईन अशी धमकी तो देत होता. पोलिसांनी त्याला पत्नीला शोधून काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ११.३० च्या सुमारास तो खाली उतरला.
रामप्रसाद पोलवर चढलेला असताना त्याला शॉक लागू नये यासाठी विद्युत विभागाला त्या पोलमधून सुरु असलेला वीज पुरवठा बंद करावा लागला. रामप्रसादला चार मुले असून कौटुंबिक वादातून त्याची पत्नी त्याला सोडून गेली. खाली उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली. रामप्रसाद पोलवर जाताना सोबत पाण्याची बाटली, बिस्कीटे घेऊन गेला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.