त्यांनी मने हेलावताना पाहिली..!

By admin | Published: April 28, 2015 01:22 AM2015-04-28T01:22:57+5:302015-04-28T01:22:57+5:30

मृत्यू कसा असतो ते डोळे गच्च बंद केले तरी दिसतो. लहानसा दगडही किती वेगात आदळू शकतो..रस्ता फाटताना पाहिला..आणि मने हेलावताना.

He looked at the mana ..! | त्यांनी मने हेलावताना पाहिली..!

त्यांनी मने हेलावताना पाहिली..!

Next

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भारतात कधी पोहचू हाच ध्यास जीव मुठीत घेऊन सुरू होता. दिल्लीच्या विमानतळावर उतरलो आणि कानठळया बसतील एवढे रडण्याचे आवाज, स्मशानातील धुराने व्यापलेले काठमांडूचे आकाश..घराच्या ओढीने विमानतळाच्या रन-वेवर बसलेले प्रवासी असं सारं सारं आठवू लागले. मृत्यू कसा असतो ते डोळे गच्च बंद केले तरी दिसतो. लहानसा दगडही किती वेगात आदळू शकतो..रस्ता फाटताना पाहिला..आणि मने हेलावताना.
भारतीय वायूदलाच्या विमानाने अडीचशेवर पर्यटकांचा समूह सोमवारी पहाटे दीड वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाला. उतरल्या उतरल्या त्यातील बायाबापड्यांनी जमिनीला अक्षरश: नमस्कार..आणि आसवांना मोकळी वाट करून दिली. डबडबलेल्या डोळ््यांनी त्यांनी मायभूमी गाठली होती. त्यातील २७ पर्यटकांचा समूह विदर्भातील यवतमाळचा होता. मराठवाड्यातील काही, पुणे, मुंबई व कोल्हापुरातीलही अनेकजण होते. मृत्यू पाठलाग करत होता..अशी त्यांची प्रतिक्रिया आणि डोळ््यातील आसवांमधून जाणवणारे भय काठमांडूतील जगण्याची लढाई क्षणभरात सांगून गेले. दोन्ही गालांवर तळहात घट्ट ठेवून ते काठमांडुतील दोन दिवस आठवत होते. महाराष्ट्र सदनात त्यांची मुक्काम व भोजनाची सोय सरकारने केली होती. त्यांना विमानतळ ते सदनपर्यंत येण्यासाठी मोटारी होत्या. राज्य सरकारची ही व्यवस्था इतकी चोख होती की अन्य प्रांतातील काठमांडूवरून परतलेले प्रवासी याच वाहनांनी दिल्लीतील त्यांच्या मुक्कामाच्या जागेपर्यंत पोहोचले.
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील माग्रूळचे रवींद्र पोटे हे सहा कुटुंबातील २७ लोकांना घेऊन नेपाळला गेले होते. हे सारेच कृषी केंद्र चालवतात. डोळ््यापुढून मृत्यूचे तांडव सरकत नसले तरी सावरत त्यातील एकेक जण आपबिती सांगू लागला. डोंगरावरच्या मनोकामना मंदिराला जाण्यासाठी केबल कार आहे. तिथे हे सारे २५ च्या दुपारी उभे होते. दीड हजारांवर पर्यंटकांनी तिकिटे काढून नंबर लावला होता. दुपारी जोरदार कंपने सुरू झाली..आणि क्षणात डोंगराच्या दिशेने जाणाऱ्या केबल कारने जमिनीचा वेध घेतला. जमिनीतून कानठळÞ्या बसेल असा आवाज आला..डोंगरावरून दगडं जमिनीच्या दिशेने वेगात झेपावू लागले. काही दगडांचे तुकडे हवेत उडू लागले..तोवर भूकंप झाल्याचे साऱ्यांनात कळले होते. फारतर १०० सेंकद हा निसर्गाचा हा खेळ सुरू होता. रस्ते फाटू लागले. सारेच गोलगोल फिरू लागले. इमारती तिरक्या होऊन पडू लागल्या..लोकांनी एकच गलका करून मुख्य रस्ता धरला. तिथे एकही वाहन थांबत नव्हते. आमचे वाहन कुठे आहे त्याचा पत्ता लागत नव्हता. तासभर आम्ही स्त्यावरच उभे. तोवर पाय मोडलेले, रक्त भळभळणाऱ्या जखमा घेऊन लोक दिसू लागले. मराठी बोलणारा कोणीही दिसला तरी त्याला आम्ही दिलासा देत होतो. हाच प्रकार साऱ्यांच प्रांतातील पर्यंटकांचा सुरू होता. दोन तासांनी आमची मोटार आली..दोनशे किलोमीटर पार करून थेट विमानतळ गाठला. सायंकाळ झाली होती. तिथला नजारा तर अधिक भयंकर होता. वीज गेलेली. पाहावे तिकडे फक्त लोकच लोक. परस्परांना शोधणाऱ्या नजरा. पोलीसांचा पत्ता नाही. हॉटेल्स पटापट बंद होताहेत. खाण्याचे पदार्थ संपू लागले. घरदारे बंद करून नेपाळी जनता रस्त्यावर उभी होती. सुरक्षा नसल्याने विमानतळÞाच्या रन-वेपासून बाहेरच्या रस्त्यापर्यंत फक्त लोकच होती. विमाने येत नव्हती. घोषणाही होत नव्हत्या. रात्र सरली. झोप उडालेली. रात्री उशिरा केव्हातरी मोबाईलला रेंज आली..आणि भारताततून संपर्क होऊ लागला. वायूदलाचे विमान येत असल्याचे सांगण्यात आले. जिवात जीव आला. विमानतळ अधिकाऱ्याकडे नंबर लावून आलो. तिथे भयभीत प्रवाशांची प्रचंड गर्दी. कंपने सुरू झाली की अख्खे कुटुंब एकमेकांना बिलगत होते. जगण्याचे त्राण येणारा प्रत्येक धक्का हिरावून नेत होता. असे चाळीस धक्के आम्ही अनुभवले. आपण बोलतो, एकमेकांना बघतो ते पुढच्या क्षणी असेल, हा प्रश्न प्रत्येकाची नजर सांगत होती. स्मशानभूमीतून निघणाऱ्या धुराने आभाळात दाटी केली होती. रस्त्यावरून सायरन वाजवत जाणाऱ्या रूग्णवाहिका, शववाहिकांनी जगण्याची उमेदच गोठवून टाकली होती. पावसाचा मारा अधून मधून सुरूच होता. थंडीही वाढली होती. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर रविवारी सायंकाळी पुन्हा दोन विमाने आली.
नेपाळ सरकारचे व्यवस्थापन पूर्णत: कोलमडले असून, मायदेशी आम्ही सुखरूप पोहचलो ते भारत सरकारच्या तप्तरतेमुळे. विमानतळावर महाराष्ट्रातील सहाशेवर पर्यटक होते. ते सारेच एकमेकांना निरोप देते होते तेव्हा त्यांच्या डोळ््यात आसवे उभी होती. मायदेशी परतलेल्या साऱ्यांच्या भयकथा अशाच आहेत..

महाराष्ट्राची अद्ययावत कंट्रोल रूम
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारने मदत कक्ष उघडला आहे. तीन दिवसांपासून रात्रंदिवस तेथून पर्यटकांशी संपर्क साधला जातो. या मदत केंद्रातून काठमांडुच्या भारतीय दुतावासातही संपर्क केला जात आहे. दिल्ली विमानतळावर सदन व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी मदत कक्ष उघडला आहे.

तिथे येणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रीय पर्यटकाची मदत केली जाते. निवास, भोजनाची व्यवस्था करून रेल्वेच्या तिसऱ्या श्रेणीच्या वातानुकुलित प्रवासाची निशु:ल्क व्यवस्था केली आहे. विशेष असे, मुख्यमंत्री फडणवीस याचे पर्यंटकांच्या सुविधेबाबत विचारणा करणारे दर तासाला फोन दर तासाला व टष्ट्वीटर मॅसेज येत आहेत.

Web Title: He looked at the mana ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.