"तो" चहावाला पाकिस्तानी नाही; जियो न्यूजचा दावा
By admin | Published: July 13, 2017 11:21 AM2017-07-13T11:21:37+5:302017-07-13T11:21:37+5:30
निळ्या डोळ्यांचा चहावाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13- काही महिन्यांपूर्वी निळे डोळे असणाऱ्या एका चहावाल्याने तरूणींना चांगलीच भूरळ घातली होती. सोशल मीडियावर त्या चहावालाच्या फोटोचीच चर्चा बघायला मिळाली होती. तोच निळ्या डोळ्यांचा चहावाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानमधल्या फोटोग्राफर जिया अली या तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहावाल्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्या तरूणाचे निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला चहावाला बराच लोकप्रिय झाला होता. तसंच त्याच्या लूकमुळे त्याला मॉडेलिंगच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. त्या तरूणाचं अर्शद खान असं नाव असून तो पाकिस्तानच्या इतवार बाजारात चहा विकत होता. पण आता पाकिस्तानी मीडियाने त्या चहावाल्याचं सत्य बाहेर आणल्याचा दावा केला आहे. अर्शद खान हा मुळचा पाकिस्तानी नाही, असा दावा पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने केला आहे. अर्शद हा मूळचा अफगाणिस्तानचा असल्याचंही बोललं जातं आहे.
जियो न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीला ‘द नॅशनल डाटाबेस अँड रजिस्ट्रेशन ऑथॅरिटीने’ने दिलेल्या माहितीनुसार अर्थद खान मूळचा पाकिस्तानचा नसून अफगाणिस्तानचा आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. तसंच पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं त्याच्याकडे नाहीत, तो बेकायदेशीरपणे तिथे राहतो असंही त्यांनी म्हटलं आहे. या वृत्ताला अफगाणिस्तानच्या दूतावातील अधिकारी डॉक्टर ओमर झाकीलवाल यांनीही दुजोरा दिला आहे. तो पाकिस्तानचा नसून मुळचा अफगाणिस्तानचा आहे असं ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. अर्शदने पाकिस्तानी पासपोर्टसाठीही अर्ज केल्याचं समजत आहे. आपल्या प्रसिद्धीचा वापर करून त्याने खोटी कागदपत्र सादर केली असल्याचंही वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.
आणखी वाचा
पनामागेट प्रकरण : नवाज शरीफांची खुर्ची गेल्यास यांच्याकडे पंतप्रधानपद?
छोट्या युद्धांसाठी केंद्राची तयारी, लष्कराला आर्थिक निर्णय घेण्याचा हक्क
गँगस्टरच्या एन्काऊंटरनंतर संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ
दरम्यान, अर्शदला जियो न्यूजने याबद्दलची विचारणा केल्यावर त्याने मूळचा अफगाणिस्तानचा असल्याची माहिती पूर्णपणे फेटाळून लावली. तसंच त्याच्या वडिलांचा पाकिस्तानी पंजाबमध्ये जन्म झाल्याचं त्याने सांगितलं. पण अर्शदकडे त्याने केलेला दावा खरं करून दाखविण्यासाठी कोणतीही कागदपत्र नव्हती.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या चहावाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तरूणींना घायाळ करणाऱ्या या चहावाल्याला अनेकांनी मॉडेलिंगच्या ऑफर्सही दिल्या होत्या.