मोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:41 AM2018-12-15T06:41:22+5:302018-12-15T06:41:39+5:30

८४ देशांचे दौरे; परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी संसदेत दिली माहिती

He spent $ 280 million on Modi's foreign tours | मोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च

मोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च

Next

नवी दिल्ली : मागील साडेचार वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८४ देशांचे दौरे केले. त्यावर करदात्यांचे २८० दशलक्ष डॉलर खर्च झाले. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने संसदेत ही माहिती देण्यात आली.

खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक दौºयाचा खर्च संसदेत सादर केला आहे. त्यात पंतप्रधानांच्या सेवेतील ‘एअर इंडिया वन’चा देखभाल खर्च आणि हॉटलाईन उभारण्याचा खर्चही समाविष्ट आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सातत्याने विविध देशांना भेटी दिल्या आहेत.

या दौºयांत त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानी पंतप्रधान सिंजो आबे यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढविणे आणि भारताचे रणनीतिक हित सुरक्षित करणे या उद्देशाने मोदींनी हे दौरे केल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. चीनमधील वुहान शहरात मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिखर चर्चा केली. ही चर्चा मुत्सद्देगिरीच्या पातळीवर कमालीची यशस्वी झाल्याचे मानण्यात येते. दोन्ही देशांच्या सीमांवरील तणाव निवळण्यास त्यामुळे मदत झाली.

मोदी यांच्या काही परराष्ट्र दौºयांमुळे वाद निर्माण झाला होता. २०१६ मध्ये मोदी यांनी नोटाबंदी लागू केल्यानंतर लगेचच जपानचा दौरा केला. सामान्य लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे करून मोदी जगाचा प्रवास करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी यावर केला होता.

मांसाहारी देशाला गायींची भेट
आफ्रिकेच्या दौºयावर असताना त्यांनी रवांडाला २०० गायी दिल्या. रवांडा हा संपूर्णत: मांसाहारी देश असून, भारताने दिलेल्या गायींची कत्तल होणे अटळ होते. देशात गोहत्याबंदी लागू करतानाच विदेशात कत्तलीसाठी गायी दिल्याचा ठपका त्यांच्यावर त्यामुळे ठेवण्यात आला.

Web Title: He spent $ 280 million on Modi's foreign tours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.