त्यानं मोटारबाइकवरून फेकली वरमाळा आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 03:38 AM2018-04-24T03:38:31+5:302018-04-24T03:38:31+5:30

मुलीच्या घरच्यांनी दिला चोप : पोलिसांनी सुनावले; दोघेही सज्ञान असल्याने तुम्ही काहीही करू शकत नाही

He threw himself on the motorbike and ... | त्यानं मोटारबाइकवरून फेकली वरमाळा आणि...

त्यानं मोटारबाइकवरून फेकली वरमाळा आणि...

Next

नायिकेच्या वडिलांनी तिचा विवाह तिला न आवडलेल्या व्यक्तीशी वा चक्क खलनायकाशीच ठरवलेलं असतं. लग्नाचे विधी सुरू होतात. ती तणावाखाली असते. अचानक नायक तिथे पोहोचतो. तिला पाहून तिच्या जीवात जीव येतो. नायक मग सर्वांच्या समोर तिला घेऊ न जातो आणि मंडपातील सारेच स्तंभित होतात. हे आपण सर्वांनी अनेकदा चित्रपटांत पाहिलं आहे.
पण प्रत्यक्षात असं क्वचितच घडतं. असाच एक प्रकार घडला. एक तरुण व तरुणीचं कॉलेजात असतानाचं प्रेम होतं. पण दोघांची जात वेगळी. घरच्यांचा त्यामुळेच विरोध होता. त्यामुळे त्यांनी भलत्याच मुलाशी तिचा विवाह निश्चित केला. लग्नाच्या मंडपात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात माळ घालणार, इतक्यात तो प्रियकर मोटारबाइकवरून तिथं पोहोचला. त्यांनी बाइकवर बसूनच आपल्या हातातील हार तिच्या दिशेनं फेकला. तो बरोबरच तिच्या गळ्यातच जाऊ न पडला. लगेच तीही त्याच्या दिशेनं धावत गेली आणि तिनंही त्याच्या गळ्यात हार घातला.
मग काय, झाला की विवाह दोघांचा. अर्थात मुलीच्या घरच्यांनी त्याला चोपून काढलं. हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्यावेळी ती त्याच्या अंगावर पडली आणि तिनं त्याला वाचवलं. तोपर्यंत पोलीसही पोहोचले. त्यांनी त्याची मारहाणीतून सुटका केली. दोघंही सज्ञान असल्याने तुम्ही काही करू शकत नाही, असं पालकांना सुनावलं. त्यामुळे तिचे पालकही गप्प झाले. मुलाकडचे लोक मात्र तणतणत तिथून निघून गेले. हा किस्सा उत्तर प्रदेशातल्या बिजनोरमधला.

त्या दोघींनीही केला विवाह
दुसरा किस्साही उत्तर प्रदेशातलाच. पण शहर आग्रा. तिथं दोन मुलींचं एकमेकांवर प्रेम होतं. आता दोन मुलींचा एकमेकींशी विवाह करून द्यायला आपले पालक तयार होणार नाहीत, याची त्यांनाही माहिती होती. त्यामुळे त्यांच्यापैकी एकीनं विवाह संस्थेत मुलगा म्हणून, तर दुसरीनं मुलगी म्हणून नोंदणी केली. दोघींनी एकमेकांना पती व पत्नी म्हणून पसंत केलं आणि सामुदायिक विवाह सोहळ्यात चक्क लग्नही केलं. त्यासाठी दोघींनी पालकही भाड्यानं आणले होते. विवाह झाल्यानंतरही दोघींच्या पालकांनी त्यांचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, दमदाटी केली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. पोलिसांना बोलावलं. त्यांनीही समजावलं. त्याचंही या मुलींनी ऐकलं नाही. दोघींंनी एकत्र राहण्याचा आमचा निर्णय कायम आहे, असं ठामपणे सांगितलं.त्यामुळे पोलीसही परत गेले.

Web Title: He threw himself on the motorbike and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न