निवृत्त होणाऱ्या सचिवांचे उत्तराधिकारी ठरेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:59 AM2022-02-01T05:59:19+5:302022-02-01T06:00:01+5:30
Central Government: केंद्रीय अर्थसंकल्प आणि पाच राज्यांतील निवडणुकांमुळे प्रशासकीय निर्णय लांबणीवर पडल्याचे दिसते. सर्वसाधारणत: केंद्रात सचिवांच्या नियुक्त्या वेळेत केल्या जातात किंवा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येतो
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प आणि पाच राज्यांतील निवडणुकांमुळे प्रशासकीय निर्णय लांबणीवर पडल्याचे दिसते. सर्वसाधारणत: केंद्रात सचिवांच्या नियुक्त्या वेळेत केल्या जातात किंवा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येतो अथवा त्यांचे उत्तराधिकारी नियुक्त केले जातात; परंतु, ३ सचिव निवृत्त होत असताना यापैकी काहीही घडलेले नाही.
केेंद्रीय युवक कल्याण सचिव उषा शर्मा यांना कालच मुख्य सचिवपदाची सूत्रे घेण्यासाठी राजस्थानला पाठविण्यात आले आहे; परंतु, त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. अन्न प्रक्रिया सचिव पुष्पा सुब्रमण्यम, केंद्रीय रासायनिक आणि पेट्रोकेमिकल्स सचिव योगेंद्र त्रिपाठी हे आज निवृत्त होत आहेत, तर केंद्रीय वित्तीय सेवा सचिव देबाशीष पांडा यांनी आज निवृत्तीचे वय गाठले आहे. पुष्पा सुब्रमण्यम यांचे उत्तराधिकारी म्हणून अनिता प्रवीण यांची नियुक्ती केली आहे. प्रवीण कुमार श्रीवास्तव (सचिव समन्वयक, कॅबिनेट सचिवालय), अरुण कुमार (विशेष सचिव, कृषी ) आणि नीलम एस. कुमार (प्रधान मुख्य लेखा नियंत्रक, सीबीडीटी) हेही आजच निवृत्त होत आहेत.