स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मला 'अल-कायदा' इंडियाचा प्रमुख

By admin | Published: December 19, 2015 11:15 AM2015-12-19T11:15:44+5:302015-12-19T12:18:49+5:30

'अल-कायदा' या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या भारतातील शाखेचा सनाऊल हक हा उत्तर प्रदेशमधील एका स्वातंत्र सैनिकाच्या कुटुंबाशी संलग्न असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

The head of the freedom fighters was born in Al-Qaeda, India | स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मला 'अल-कायदा' इंडियाचा प्रमुख

स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मला 'अल-कायदा' इंडियाचा प्रमुख

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - 'अल-कायदा' या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या भारतातील शाखेचा सनाऊल हक हा उत्तर प्रदेशमधील एका स्वातंत्र सैनिकाच्या कुटुंबाशी संलग्न असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल-कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेची जबाबदारी सांभाळणारा आणि सुरक्षा दलाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेला ४० वर्षीय मौलाना असीम उमर हा उत्तर प्रदेशमधील संभलचा रहिवासी असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. सनाऊलचे वडील इरफान याच्या वडिलांचे नातेवाईक स्वातंत्र्य सैनिक होते.
सध्या फरार असलेला सनाऊल १४ वर्षांपूर्वीच घरातून पळून गेला आणइ दहशतवादी संघटनांसाठी काम करू लागला. तो अल कायदाचा इंडिया चीफ म्हणून काम करतो, अल जवाहिरी यांनी गेल्या वर्षी त्याची निवड केली होती.
दरम्यान या माहितीमुळे सनऊलच्या कुटुंबियांना धक्का बसला असला तरीही त्यांना फारसे आश्चर्य वाटलेले नाही. ' सनाऊलने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याची माहिती स्थानिक गुप्तचर संस्थेच्या अधिका-यांनी आम्हाला ६ वर्षांपूर्वी दिली होती, आमच्यासाठी तो तेव्हाच मेला होता' अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्याच्या ७० वर्षीय आईने दिली. 
२००९ साली स्थानिक गुप्तहेर एंजट्सनी संभल येथील दीपा सराई गावात जाऊन सनौल हकच्या कुटुंबियांची भेट घेतली होती.
' तुमचा मुलगा १४ वर्षांपूर्वीच मरण पावला असं तुम्हाला वाटत होतं, पण तो जिवंत असून तो तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान तसेच अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांसाठी काम करत आहे' अशी माहिती त्यांनी हकच्या कुटुंबियांना दिली. यामुळे अतिशय दु:खी व व्यथित झालेल्या सनौल हकचे वडील इरफान-उल-हक यांनी वडिलांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सनौलशी आपला काहीही संबध नसल्याचे जाहीर करत त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले
' सनौलला पहिल्यापासूनच वाचनात, पुस्तकांत रस होता. पण एके दिवशी अचानक त्याने मदरसात जाऊन कुराण व अरबी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. जर मी शिकून हाफिज बनलो तर आपल्या सर्वांना  स्वर्ग मिळेल, असे त्याने आम्हाला सांगितले. मी या गोष्टीसाठी राजी नव्हतो, मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याने आमचे काहीच ऐकले नाही, असे हकचे वडील इरफान-उल-हक यांनी सांगितले.  '१९५ साली त्याने पुढील शिक्षणसाठी मक्का येथे जाण्याबद्दल सांगत माझ्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि परिस्थिती आणखीनच बिघडली. मला त्याच्या मागणीमुळे धक्का बसला. कुटुंबाची मदत करण्यासाठी एखादी नोकरी शोध किंवा इथेच शिक्षण घे असे मी त्याला सांगितले, पण त्याला हा देश सोडूनच जायचं होत. या मुद्यावरून खूप वाद झाले, त्याच्या काकांनी त्याला खूप मारलही. आम्हाला त्याची खूप काळजी वाटत होती, असे त्याचे वडील म्हणाले.
आणि एके दिवशी अचानक सनौल गायब झाला आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तो हरवल्याची तक्रार नोंदवली. १४ वर्ष उलटून गेल्यावरही त्याचा काहीच शोध न लागल्याने तो मरण पावला, असे त्याच्या कुटुंबियांना वाटले मात्र गुप्तचरांनी अचानक त्यांच्या घरी येऊन तो दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची माहिती दिल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला. 

Web Title: The head of the freedom fighters was born in Al-Qaeda, India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.