चांगला पती मिळण्यासाठी डोक्याचे मुंडन
By admin | Published: May 16, 2017 01:42 AM2017-05-16T01:42:38+5:302017-05-16T01:42:38+5:30
चांगला पती मिळावा म्हणून भारतात उपवर मुली व्रत करतात, तर दक्षिण आफ्रिकेतील मुली डोक्याचे मुंडन करतात
नवी दिल्ली : चांगला पती मिळावा म्हणून भारतात उपवर मुली व्रत करतात, तर दक्षिण आफ्रिकेतील मुली डोक्याचे मुंडन करतात. इथोपिया आणि सोमालियादरम्यानच्या वसाहतीत राहणाऱ्या बोराना जमातीत ही प्रथा आहे. विवाह झाल्यानंतर या मुलींना केस वाढविण्याची मोकळीक दिली जाते. त्या संपूर्ण डोक्याचे नाही तर डोक्याच्या एका मोठ्या भागाचे मुंडन करतात. मुंडन केल्यामुळे मुलींना चांगला वर मिळून तिचे आयुष्य सुखीसमाधानी होते, अशी श्रद्धा आहे. विवाह झाल्यानंतर या मुलींना केस वाढविण्याची आणि केशसज्जा करण्याची मोकळीक दिली जाते. बोराना जमातीच्या लोकांना छायाचित्रे काढणेही आवडत नाही. छायाचित्रे काढल्यामुळे शरीरातील रक्त कमी होते, अशी त्यांची समजूत आहे. ही अंधश्रद्धा असल्याचे आज आपण सर्वजण जाणतो; मात्र बोराना जमातीचे लोक याचे पालन करतात. येथील महिला शेळीच्या कातड्यापासून तयार केलेली वस्त्रे घालतात. या समुदायाची आणखी एक प्रथा आहे. एखाद्या महिलेचा पती घरी उशिरा आला आणि घराबाहेर एखाद्या माणसाचा भाला रोवलेला दिसला तर तो घरात जाऊ शकत नाही.