२००९मध्ये हेडलीने केली होती पुण्याच्या लष्करी तळाची रेकी
By admin | Published: February 13, 2016 09:19 AM2016-02-13T09:19:11+5:302016-02-13T12:57:13+5:30
पुण्याच्या लष्करी तळाची १६ व १७ मार्च २००९ मध्ये मी पाहणी केली होती, त्यावेळी सूर्या व्हिला या हॉटेलमध्ये आपण उतरलो होतो अशी साक्ष व्हिडीयो लिंकद्वारे डेव्हिड कोलमन हेडलीने
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - पुण्याच्या लष्करी तळाची १६ व १७ मार्च २००९ मध्ये मी पाहणी केली होती, त्यावेळी सूर्या व्हिला या हॉटेलमध्ये आपण उतरलो होतो अशी साक्ष व्हिडीयो लिंकद्वारे डेव्हिड कोलमन हेडलीने मुंबई न्यायालयासमोर दिली आहे.
पुण्यामध्ये फिरून शहराचे व्हिडीयो चित्रीकरणही आपण केले होते आणि ज्यूंच्या छाबड हाऊसचेही चित्रीकरण केले होते असे हेडली म्हणाला.
पुण्यातला लष्करी तळ म्हणजे भारतीय लष्कराचे दक्षिणेकडील मुख्यालय असल्याचे हेडलीने म्हटले आहे.
पुण्यामधल्या लष्करी तळामध्ये शिरकाव करून लष्करातल्या काही जणांना एजंट म्हणून नेमण्याची आणि गुप्त माहिती फोडण्याचा प्रयत्न करण्याची सूचना मेजर इक्बालने आपल्याला दिली होती असे हेडलीने म्हटले आहे. मुंबईवरील हदशतवादी हल्ल्यानंतर हेडली शिकागोमध्ये डॉ. तहव्वूर राणाला भेटला. दहशतवादी हल्ल्यामुळे राणा खूश झाल्याचे हेडलीने सांगितले.
हेडलीच्या साक्षीतले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- झाकी उर रेहमानचा मुलगा काश्मिरमध्ये भारतीय सैन्याशी लढताना मारला गेला.
- ३ ऑक्टोबर २००९ या दिवशी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने अटक करेपर्यंत माझी कुणीही कधीही चौकशी केली नाही.
- राजाराम रेगे फोन व ईमेलच्या माध्यमातून माझ्या संपर्कात होता, त्याला अमेरिकेमध्ये सेमिनार व कॉन्फरन्समध्ये गुंतवण्याचा सल्ला मेजर इक्बालने मला दिला.
- मेजर इक्बालला मी राजाराम रेगेची माहिती दिली होती, त्याच्या माध्यमातून इक्बालला शिवसेनेच्या जवळ जायचं होतं.
- पाकिस्तानात सगळे अंकल सुरक्षित असल्याचा मेल साजिद मीरने मला पाठवला. हाफिज सईदला काहीही होणार नाही याची हमी मला साजिद मीरने दिली.
- पाकिस्तान लष्करशी संबंधित अनेकांची चौकशी करत असल्याचं समजलं, त्यामुळे हाफिज सईद आणि झाकी उर रेहमान ठीक आहेत ना असं विचारणारा मेल आपण केला होता.
- हाफिज सईदचा उल्लेख हेडली अंकल असा करीत असे तर झाकी उर रेहमानचा उल्लेख तो सईदचे मित्र असा करत असे.
- मारलं जाण्याची किंवा अटक होण्याची भीती होती तरीही मी भारतात पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला होता आणि माझं मृत्यूपत्र करून ते मी डॉ. तहव्वूर राणांकडे दिलं होतं.
- gulati22@hotmail.com हा माझा ईमेल आयडी होता तर rare.lemon@gmail.com हा साजिद मीरचा ईमेल आयडी होता आणि यांचा वापर आम्ही संदेशा देण्याघेण्यासाठी करत होतो.
- मेजर इक्बालनी मला भारतीय लष्करातल्या काही जणांना फोडण्याची आणि गुप्त माहिती काढण्यासाठी एजंट नेमण्याची सूचना केली होती.
- पुण्यामधल्या भारताच्या लष्करी तळाचीही पाहणी मी केली होती.