१६ पोलिसांचे नातलग निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यालयी ‘अटॅच’: पोलीस आयुक्तांची कारवाई

By admin | Published: February 15, 2017 09:01 PM2017-02-15T21:01:30+5:302017-02-15T21:01:30+5:30

१६ पोलिसांचे नातलग निवडणुकीच्या आखाड्यात

Headquarters 'attach' in police custody of 16 police naxals: Police Commissioner's action | १६ पोलिसांचे नातलग निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यालयी ‘अटॅच’: पोलीस आयुक्तांची कारवाई

१६ पोलिसांचे नातलग निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यालयी ‘अटॅच’: पोलीस आयुक्तांची कारवाई

Next



अमरावती : पोलीस आयुक्तालय हद्दीत कार्यरत असणाऱ्या १६ पोलिसांचे नातेवाईक हे आगामी निवडणुकीच्या आखाड्यात असल्यामुळे अशा पोलिसांना मुख्यालयी ‘अटॅच’ करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
निवडणुकीतील उमेदवारांचे नातेवाईक हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे ते उमेदवारांना सहकार्य करू शकतात. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी १६ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयी ‘अटॅच’ केले आहे. यामध्ये राजापेठचे विनोद पांडे, संजय पंचगाम, नरेंद्र सोनोने, वलगावचे कुऱ्हेकर, खोलापुरी गेटचे ज्ञानेश्वर नरवणे, राजेश जठाळे, गजानन रेवस्कर, फे्रजरपुऱ्याचे अनिल कुठांरे, पोलीस मुख्यालयातील महेंद्र ठाकूर, शैलेश ठाकूर, विजेंद्र सिसोदीया, नरेंद्र सिसोदीया, नारायण सोळंके, प्रकाश लांडगे, राजेंद्र उमक, मोहम्मद मलीक अहमद यांचा समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेतील बंदोबस्ताचे काही कामकाज या पोलिसांना दिले जाणार आहे. मात्र, त्यांचा जनसंपर्क येईल असे कोणतेही काम दिले जाणार नाही. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, असे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले.

Web Title: Headquarters 'attach' in police custody of 16 police naxals: Police Commissioner's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.