आरोग्य, बालविकासचे अधिकारी एकत्र करणार काम जि.प. कार्यशाळा : दर महिन्याला बैठकीचे नियोजन

By Admin | Published: October 22, 2016 12:53 AM2016-10-22T00:53:06+5:302016-10-22T00:53:06+5:30

जळगाव : कुपोषणमुक्तीसंबंधी येत्या पाच महिन्याचा आराखडा शुक्रवारी जि.प.मध्ये नंदुरबार व जळगाव जि.प.तर्फे आयोजित कुपोषणुक्तीसंबंधीच्या कार्यशाळेत निश्चित झाला. त्यात कुपोषणमुक्तीसाठी जि.प.चा आरोग्य व बाल विकास विभाग एकत्रितपणे काम करतील, असा निर्धार झाला. दुपारी या दोन दिवशीय कार्यशाळेचा समारोप झाला.

Health and Child Development Officers To Work Together Workshop: Meeting arrangement every month | आरोग्य, बालविकासचे अधिकारी एकत्र करणार काम जि.प. कार्यशाळा : दर महिन्याला बैठकीचे नियोजन

आरोग्य, बालविकासचे अधिकारी एकत्र करणार काम जि.प. कार्यशाळा : दर महिन्याला बैठकीचे नियोजन

googlenewsNext
गाव : कुपोषणमुक्तीसंबंधी येत्या पाच महिन्याचा आराखडा शुक्रवारी जि.प.मध्ये नंदुरबार व जळगाव जि.प.तर्फे आयोजित कुपोषणुक्तीसंबंधीच्या कार्यशाळेत निश्चित झाला. त्यात कुपोषणमुक्तीसाठी जि.प.चा आरोग्य व बाल विकास विभाग एकत्रितपणे काम करतील, असा निर्धार झाला. दुपारी या दोन दिवशीय कार्यशाळेचा समारोप झाला.
या वेळी अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दुसाने, नंदुरबार येथील बाल विकास अधिकारी बागुल, पर्यवेक्षिका व इतर वरिष्ठ उपस्थित होते.

दर महिन्याला बैठक
कुपोषणमुक्तीसंबंधी तालुकास्तराव आरोग्य व बाल विकास विभागाची बैठक होईल. त्यात अंगणवाडी सेविकांनाही सहभागी करून घेतले जाईल. कुपोषणुक्तीसाठी झालेल्या कार्यवाहीचा आढावा त्यात घेतला जाईल.

माता सक्षमीकरण
बाळ २४ तास त्याच्या मातेजवळ असते. त्यामुळे माता सक्षमीकरणावर भर दिला जाणार असल्याचे कार्यशाळेत चर्चिण्यात आले. गरोदरपण, प्रसूती पूर्व व पश्चात काय काळजी घ्यावी, बाळाचे आजारपण, आहार यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. येत्या पाच महिन्यात जिल्हा कुपोषणुक्त करण्यासंबंधीचा निर्धार पुन्हा एकदा झाला.

Web Title: Health and Child Development Officers To Work Together Workshop: Meeting arrangement every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.