आरोग्य विभागास मिळणार २६ वाहने प्रक्रिया सुरू: लवकरच निविदा

By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:26+5:302016-02-08T22:55:26+5:30

जळगाव : १४ व्या वीत्त आयोगाच्या निधीतून महापालिकेतील आरोग्य विभागाच्या ताफ्यात आणखी २६ वाहने दाखल होणार आहेत. या संदर्भातील कामकाही सुरू झाले आहे.

Health Department to get 26 vehicles to be processed: Tender soon | आरोग्य विभागास मिळणार २६ वाहने प्रक्रिया सुरू: लवकरच निविदा

आरोग्य विभागास मिळणार २६ वाहने प्रक्रिया सुरू: लवकरच निविदा

Next
गाव : १४ व्या वीत्त आयोगाच्या निधीतून महापालिकेतील आरोग्य विभागाच्या ताफ्यात आणखी २६ वाहने दाखल होणार आहेत. या संदर्भातील कामकाही सुरू झाले आहे.
शहरातील साफसफाईच्या कामास अधिक गती यावी, तक्रारी राहू नये असे महापालिकेचे प्रयत्न आहेत. त्यातच ताफ्यातील बरेची वाहने ही जुनी आहेत. त्यामुळे बर्‍याच वेळेस कामकाजातही अडचणी येत असतात. महापालिकेस आरोग्य विभागाच्या कामकाजासाठी काही निधी प्राप्त झाला आहे. त्या अंतर्गत नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून विविध प्रकारची वाहने त्या अंतर्गत घेतली जाणार आहेत.
अशी होणार खरेदी
ट्रॉलिसह १० ट्रॅक्टर, लोडरसह ४ ट्रॅक्टर, वॉटर टॅँकर ३, व्हॅक्युम एमपीआर मोठे व लहान, मोठ्या घंटागाड्या सहा अशी २६ वाहने खरेदीचा प्रस्ताव आहे.
------
विविध कामांसाठी १४ व्या वीत्त आयोगाकडून महापालिकेस प्राप्त निधीतून ही खरेदी केली जाणार असून त्याची निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Health Department to get 26 vehicles to be processed: Tender soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.