आरोग्य मंत्रा : डाएट करताना या 7 गोष्टी टाळा

By admin | Published: March 9, 2017 01:48 PM2017-03-09T13:48:46+5:302017-03-09T14:05:42+5:30

डाएटिंग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी टाळण्याची गरज असते

Health Mantra: Avoid These 7 Things While Dieting | आरोग्य मंत्रा : डाएट करताना या 7 गोष्टी टाळा

आरोग्य मंत्रा : डाएट करताना या 7 गोष्टी टाळा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - वाढत्या वयासोबत होणारे शारिरीक त्रास, वाढतं वजन यासारखे अनेक प्रश्न सर्वांना भेडसावत असतात. आपलं वय कितीही झालं तरी आपण एकदम फिट आणि परफेक्ट दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण त्यासाठी योग्य ती काळजी घेतली नाही. मग शेवटी सर्वाचं लक्ष जात ते डाएटवर. पण तसं पाहायला गेलं तर व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्यात आपण कधी आणि काय खातो याकडे लक्ष देणं तसं कठीणच जातं. तसंच आपण कशाप्रकारे खातो याकडे लक्ष देणंही सहसा जमत नाही. डाएट करणं तशी सोपी गोष्ट नाही, पण ते इतकं कठीणही नाही. डायटिंग करत असताना काही गोष्टी टाळण्याची गरज असते. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे -
 
1) योग्य व्यायाम न करणे 
आपल्याला एक वर्कआऊट रुटीन तयार करण्याची गरज आहे जेणेकरुन आपल्या दैनंदिन जीवनात कोणताही बदल करता आपल्या रोजच्या टाईमटेबलमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. पुर्णवेळ नोकरी करताना शरिराची काळजी घेणं आणि फिट राहणं तसं कठीणच आहे. अनेकदा दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर घरी थकून भागून आल्यावर जिममध्ये जाण्यास वेळ मिळतच नाही. खरंतर फक्त 30 मिनिटांचा वर्कआऊट आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप आहे. त्यामुळे असा वर्कआऊट प्लान करणं आपल्या फायद्याचं आहे. 
 
2) घाई-घाईत जेवणे
जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा पोट भरलं आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्या मेंदूला 20 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे नेहमी जेवताना हळू हळू जेवलं पाहिजे जेणेकरुन आपल्या मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल देण्यासाठी वेळ मिळेल. घाई घाईत खाल्याने पोट जास्त भरतं आणि वजन वाढतं. घाई घाईत जेवणारे शरिराने जाड असणं गरजेचं नाही, पण त्यांना अपचन सारख्या समस्या जाणवू शकतात. 
 
3) ब्रेकफास्ट न करणे 
ब्रेकफास्ट हा आहारातील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. रात्रभर निद्रावस्थेत असल्याने आपलं शरीर फार थकलेलं असतं, त्यामुळे त्याला भूक लागलेली असते. ती मिटवण्यासाठी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. सोबतच आपल्या दिवसाची सुरुवात एनर्जी आणि न्यूट्रीशनसोबत होते. ब्रेकफास्ट सोडल्यास सकाळच्या वेळी थकवा जाणवतो आणि त्यामुळे स्नॅक्स आणि कॅलरीज घेतल्या जातात. जे लोक चांगला ब्रेकफास्ट करतात ते दिवसाला कमी जेवतात. 
 
4) जास्त कॅलरीज कमी करणे
कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होतं, पण त्यांचं प्रमाण जास्त झालं तरी त्याचा वजन कमी करण्यात काहीही फायदा होत नाही. याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. कॅलरीज मोठ्या प्रमाणात कमी केल्याने वजन वाढतं. आपल्या शरिराला एका बेसलाईन कॅलरीज लेव्हलची गरज असते जेणेकरुन बेसिक फिजिऑलॉजिकल फंक्शन्स कायम राहावेत.  जर तुम्ही या बेसलाईनच्या खाली गेलात तर तुमचा मेटाबॉलिजम कमी होतो. जर तुम्ही अत्यंत लो कॅली डाएट घेत असाल तर तुमचा मेटाबॉलिक रेट डाएट घेतल्यानंतर 48 तासांच्या आता 10 टक्क्यांनी कमी होतो. 
 
5) गरजेइतकं पाणी न पिणे 
शरीराला पाण्याची गरज असते, त्याशिवाय काही प्रक्रिया पुर्ण होत नाहीत. पाणी किती प्यावं यावर वाद-विवाद चर्चा होऊ शकते, पण आपल्या शरिराला पाण्याची गरज असते इतकं मात्र नक्की. थोड्याश्या डिहायड्रेशनमुळेही तुमचा मेटाबॉलिजम 3 टक्क्यांनी खाल येतो. जर तुम्ही डाएटवर असाल तर कमी पाणी पिणं टाळा. 
 
6) लिक्विड डाएट
लिक्विड कॅलरीज फळांच्या रसमधून मिळत असल्या तरी त्या फक्त कॅलरीज आहेत. फळांच्या रस पोषक असतो मात्र त्यामध्ये फायबरचा अभाव असतो. यामधून आपल्या रक्तात हलकी साखर मिसळली जाते. क्रीम, साखर असणारं पेय, कॉफी, सोडा असणारे पेय याच्यामध्ये खूप कॅलरीज असतात ज्या तुमच्या डाएटसाठी अजिबात फायद्याच्या नसतात. जर वजन कमी करायचं असेल तर पाण्याची मदत घेणं सर्वोत्तम.
 
7) तणावात जेवणे
दुखी: किंवा तणावात असताना जेवल्याने डाएट आणि कॅलरीजचं संतुलन बिघडतं. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुम्ही जंक आणि आरोग्यासाठी योग्य नसलेले स्नॅक्स खाता. तणावात जेवल्याचा तुमच्या वेस्टलाईनवर नकारार्थी प्रभाव पडतो. पुर्ण झोप आणि निरोगी अन्नसेवन करणं नेहमी फायद्याचं असतं. 
 

Web Title: Health Mantra: Avoid These 7 Things While Dieting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.