CoronaVirus Treatment : HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:31 AM2020-06-13T11:31:25+5:302020-06-13T12:01:25+5:30

CoronaVirus Treatment : अ‍ॅझिथ्रोमायसिन एक प्रकारचे अँटी-बायोटिक औषध आहे. जे बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंधित करते. हे अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

health ministry rollback use of azithromycin treat covid19 hydroxychloroquine corona virus icmr | CoronaVirus Treatment : HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा... 

CoronaVirus Treatment : HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा... 

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यूचा एकाच वेळी उपयोग रुग्णांवर करण्याच्या परिणामावर बरेच संशोधन करण्यात आले.फ्रान्समध्ये मार्च महिन्यात झालेल्या अभ्यासानुसार, असे दिसून आले आहे की या दोन औषधांचा एकाच वेळी वापर व्हायरल लोड कमी करण्यास उपयुक्त आहे.

नवी दिल्ली : कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅझिथ्रोमायसिनच्या  (Azithromycin) वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रोटोकॉल बदलू शकते. हे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (HCQ) सोबत वापरले जाते. सध्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांना हे औषध देण्यात येत आहे.

आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की,  "एचसीक्यूसोबत अ‍ॅझिथ्रोमायसिन वापरु नये. कारण यामुळे हृदयाची समस्या उद्भवू शकते. त्याऐवजी Doxycycline किंवा amoxycyclin आणि Clavulunic Acidचा वापर केला जाऊ शकतो."

कोरोनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलशी संबंधित एका सूत्राने याबाबतची पुष्टी केली की, 10 जून रोजी जाहीर झालेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये अ‍ॅझिथ्रोमायसिनचे एचसीक्यूसोबत वापर करण्याचा उल्लेख केला नाही. यापूर्वी आयसीएमआरने अशी शिफारस केली होती की, कोरोनावरील उपचारांसाठी एचसीक्यूसह अ‍ॅझिथ्रोमायसिन देखील दिले जाऊ शकते. दिल्लीतील एम्स रुग्णालयानेही या नव्या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि क्लिनिकल रिसर्चवर असलेले नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीत विग यांनी याबाबत सांगितले, "कोरोना संक्रमित सौम्य रूग्ण किंवा गंभीर रूग्ण असोत, सर्वात मोठा घटक म्हणजे ऑक्सिजनेशन आहे, कोरोना विषाणूच्या उपचारातील अँटीव्हायरल औषधे जास्त प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. उपचार प्रक्रिया हळूहळू बदलली आहे. पूर्वी अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू देण्यात आले होते. मात्र, आता आम्ही संशोधनानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की, अ‍ॅझिथ्रोमायसिनची आवश्यकता नाही आहे."

"अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू याचे मेल केस-टू केसवर अवलंबून असते. मार्गदर्शक तत्त्वे फक्त मार्गदर्शन करतात. अँटी-व्हायरल फक्त प्राथमिक अवस्थेत कार्य करते. त्यानंतर Anti inflammatories ची आवश्यकता भासते, असे डॉ. नवीत विग यांनी सांगितले. याशिवाय, ते  म्हणाले की, यापूर्वी रुग्णांना अ‍ॅझिथ्रोमायसिन देखील देण्यात आले होते. कारण कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना जिवाणू संसर्ग होण्याची भीती असते.

कोणत्या प्रकारचे आहे अ‍ॅझिथ्रोमायसिन? 
अ‍ॅझिथ्रोमायसिन एक प्रकारचे अँटी-बायोटिक औषध आहे. जे बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंधित करते. हे अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. न्यूमोनिया, ब्राँकायटिस, कान, घसा, फुफ्फुसाचा संसर्ग आणि लैंगिक संबंधातून पसरणारे आजार यासाठी अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर केला जातो.

कोरोनाच्या उपचारांवर अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर
अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यूचा एकाच वेळी उपयोग रुग्णांवर करण्याच्या परिणामावर बरेच संशोधन करण्यात आले. फ्रान्समध्ये मार्च महिन्यात झालेल्या अभ्यासानुसार, असे दिसून आले आहे की या दोन औषधांचा एकाच वेळी वापर व्हायरल लोड कमी करण्यास उपयुक्त आहे.

आणखी बातम्या...

'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल” 

Web Title: health ministry rollback use of azithromycin treat covid19 hydroxychloroquine corona virus icmr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.