Welcome 2021: आरोग्यम् धनसंपदा; नववर्षात आरोग्य सेवांची सर्वाधिक चलती असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 03:40 PM2021-01-01T15:40:29+5:302021-01-01T15:40:53+5:30
यंदाच्या बजेटमध्ये आरोग्याशी निगडीत अनेक नव्या गोष्टींवर अधिक निधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक बदलही होतील.
कोरोनामुळे देशातील आरोग्य सुविधांचे पितळ उघडे पडले. आता त्यात काही प्रमाणात का होईना सुधारणा होतील. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्याशी निगडीत अनेक नव्या गोष्टींवर अधिक निधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक बदलही होतील. नवे तंत्रज्ञान आरोग्य क्षेत्रात आले आहेच, त्याला आता गतीही मिळेल.
मेडिकल टुरिझम: तना-मनाला शांतता लाभेल, अशा पर्यटनस्थळी जाण्याची इच्छा असलेल्यांची संख्या वाढेल. निसर्गरम्य ठिकाण, हवा-पाणी शुद्ध, निसर्गोपचारांना वाव असेल अशा स्थळांना अधिक पसंती दिली जाईल.
१३% नी मेडिकल टुरिस्टमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे.
आयुर्वेदिक उत्पादनांना मागणी
कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. यंदाच्या वर्षातही त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
११०५ अब्ज रुपयांची उलाढाल २०२६ पर्यंत आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
लसीकरणासाठी दिसतील रांगा
देशात कोरोना लस येऊ घातली आहे. त्यामुळे आता ही लस टोचून घेण्याची इच्छा असणाऱ्यांच्या आणि ज्यांच्यासाठी ही लस अनिवार्य आहे त्यांच्या लसीकरणासाठी रांगा पाहायला मिळू शकतात.
मेडिकल टुरिझमसाठी भारतात केरळ अधिक लोकप्रिय आहे. याशिवाय परदेशातही अशाच पर्यटनस्थळांचा शोध घेतला जाईल. यंदाच्या वर्षात किमान