CoronaVirus News: ...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:17 PM2020-06-07T16:17:19+5:302020-06-07T16:19:04+5:30
मृतदेह खड्ड्यात फेकणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
पुद्दुचेरी: एकीकडे कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं देशभरात कौतुक सुरू असताना दुसरीकडे पुद्दुचेरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एका कोरोना बाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पुद्दुचेरीमध्ये एका ४२ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीनं मृताच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला. हा मृतदेह नंतर एका खड्ड्यात फेकून देण्यात आला. पुद्दुचेरीच्या आरोग्य संचालकांनी याबद्दल भाष्य करताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'आरोग्य कर्मचारी मृतदेह दफन करण्यासाठी नेत होते. मात्र अचानक मृतदेह त्यांच्या हातून निसटला. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे,' असं संचालकांनी सांगितलं.
मृत पावलेली व्यक्ती मूळची चेन्नईची रहिवासी असून पत्नीच्या भेटीसाठी पुद्दुचेरीला गेला होता. पत्नी आणि मुलं लॉकडाऊनमुळे पुद्दुचेरीमध्ये अडकली होती. पत्नीच्या माहेरी पोहोचताच त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला इंदिरा गांधी सरकारी सामान्य रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्थेत (आयजीजीएचपीजीआय) उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र त्याच्या अंत्यविधीसाठी कोणीही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे रुग्णालयातले कर्मचारी त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी घेऊन गेले. तेथील व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
रुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्...
"कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"