मांजा बंदीच्या याचिकेवर होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:14 AM2018-01-06T01:14:20+5:302018-01-06T01:14:33+5:30

काचेची भुकटी (ग्लास कोटेड) वापरून केलेला मांजाची विक्री व वापरावर देशभर बंदी घाला, अशी मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तयारी दाखवली.

 The hearing on the ban on Manja will be on | मांजा बंदीच्या याचिकेवर होणार सुनावणी

मांजा बंदीच्या याचिकेवर होणार सुनावणी

Next

नवी दिल्ली - काचेची भुकटी (ग्लास कोटेड) वापरून केलेला मांजाची विक्री व वापरावर देशभर बंदी घाला, अशी मागणी करणाºया याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तयारी दाखवली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी चिनी मांजावरील बंदी कायम ठेवली होती.
संक्रांतीचा सण येऊ घातला असून, पतंग उडविणाºयांची संख्याही या काळात प्रचंड असते, पण त्यासाठी वापरल्या जाणाºया मांजामुळे अनेक पक्षी तर जखमी होतातच, प्रस्त्याने येणारे-जाणारे पादचारी, दुचाकीस्वार यांनाही इजा होते.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) चिनी मांज्यासह काच भुकटीयुक्त मांजाची विक्री आणि वापरावर
संपूर्ण देशात बंदी घातली. या याचिकेवरील पुढील सुनावणी एक फेब्रुवारी, २०१८ रोजी असून तोपर्यंत ही बंदी कायम राहील.

Web Title:  The hearing on the ban on Manja will be on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.