झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदीबाबत सुनावणी

By admin | Published: March 19, 2017 12:31 AM2017-03-19T00:31:00+5:302017-03-19T00:31:00+5:30

डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वैधता तपासणीबाबत औरंगाबाद येथे शुक्रवारपासून

Hearing of ban on Zakir Naik's organization | झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदीबाबत सुनावणी

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदीबाबत सुनावणी

Next

औरंगाबाद : डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेची वैधता तपासणीबाबत औरंगाबाद येथे शुक्रवारपासून ‘इन कॅमेरा’ सुरूझालेली सुनावणी शनिवारी औरंगाबादपुरती पूर्ण झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता ढिंग्रा सहगल यांच्यापुढे ‘गैरकायदेशीर कृत्य प्रतिबंधक न्यायाधिकरणात’ ही सुनावणी झाली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर शनिवारी देखील दोन अधिकाऱ्यांची सरतपासणी आणि उलटतपासणी घेण्यात आली. यासंदर्भातील पुढील सुनावणी ४, ५ आणि ६ एप्रिल रोजी पुणे येथे होणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing of ban on Zakir Naik's organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.