जिल्हा बॅँक संचालकांची १३ला सुनावणी
By admin | Published: September 21, 2016 10:53 PM2016-09-21T22:53:15+5:302016-09-21T22:53:15+5:30
संचालक अपात्रता प्रकरण
Next
स चालक अपात्रता प्रकरणनाशिक : प्रशासकीय मंडळ लागू झाल्यानंतर संचालक अपात्रतेचा कायदा मंजुरीनंतर अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह ११ संचालकांच्या निर्णयावर बुधवारी (दि. २१) विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी होऊन पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोेबरला घेण्यात येणार आहे.या सुनावणीसाठी बुधवारी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्याकडे अध्यक्ष नरेंद्र दराडे, धनंजय पवार, संदीप गुळवे, गणपतराव पाटील हे चारच संचालक उपस्थित होते. तत्कालीन विभागीय सहनिबंधक मोहम्मद आरिफ यांनी पाच महिन्यांपूर्वीच जिल्हा बॅँकेच्या ११ संचालकांना प्रशासकीय मंडळाची कारकीर्द असल्याने पुढील काळात संचालक पदावर राहण्यास अपात्र का ठरवू नये, यासंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यासंदर्भात जिल्हा बॅँकेच्या वतीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. बुधवारी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी या अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या संचालकांची सुनावणी होऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय दिला. (प्रतिनिधी) इन्फो... हे आहेत ११ संचालक विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक माजी आमदार माणिकराव कोकाटे, शिरीषकुमार कोतवाल, दिलीप बनकर,ॲड. संदीप गुळवे, धनंजय पवार,माजीमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार जे. पी. गावित, माजी अध्यक्ष परवेज कोकणी, गणपतराव पाटील व अद्वय हिरे यांचा या ११ संचालकांमध्ये समावेश आहे.