हरित लवादासमोर आता १६ मार्चला सुनावणी महापालिका : बांधकाम व्यवसाय ठप्पच

By admin | Published: March 3, 2016 01:57 AM2016-03-03T01:57:12+5:302016-03-03T01:57:12+5:30

नाशिक : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील नव्या बांधकामांना तीन महिन्यांपासून मनाई असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. लवादाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी महापालिकेने केलेली याचिका बुधवारी दाखल करून घेण्यात आली. आता याचिकेवर १६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Hearing the Green Arbitration March 16: Hearing the Municipal Corporation | हरित लवादासमोर आता १६ मार्चला सुनावणी महापालिका : बांधकाम व्यवसाय ठप्पच

हरित लवादासमोर आता १६ मार्चला सुनावणी महापालिका : बांधकाम व्यवसाय ठप्पच

Next
शिक : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील नव्या बांधकामांना तीन महिन्यांपासून मनाई असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. लवादाच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यासाठी महापालिकेने केलेली याचिका बुधवारी दाखल करून घेण्यात आली. आता याचिकेवर १६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
पाथर्डी शिवारात महापालिकेचा कचर्‍यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प आहे, परंतु त्यामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे नागरिक आणि शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. काहींनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. महापालिकेला वेळोवेळी खतप्रकल्प योग्य पद्धतीने चालविण्यासाठी निर्देश देऊनही त्याचा उपयोग होत असून, पालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने गेल्या ९ नोव्हेंबरला हरित न्यायाधिकरणाने महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना मनाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नवीन बांधकाम प्रस्ताव दाखल करून घेतले जात नसल्याने बांधकाम ठप्प होण्याची वेळ आली आहे. परिणामी, महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादाकडे पुनर्विलोकन याचिका दाखल केली. त्यावर बुधवारी सुनावणी झाली असता महापालिकेने काही अटी-शर्तींवर बांधकामांना परवानग्या देण्याची विनंती केली. परंतु मुंबईतील बांधकामांनाही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाकडे बोट दाखवत हरित लवादाने पुढील सुनावणी दि. १६ मार्चला निश्चित केली. दरम्यान, आयुक्तांनी हरित लवादाच्या निर्णयाला अधीन राहून काही अटी-शर्तींवर बांधकामांना परवानगी देण्याचे मान्य केले असले तरी त्याचा लाभ मोठ्या प्रकल्पांसाठीच होणार असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांकडून केला जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्पच राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Hearing the Green Arbitration March 16: Hearing the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.