बीबीसीच्या ‘त्या’ माहितीपटावर सोमवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:54 AM2023-01-31T05:54:35+5:302023-01-31T05:55:01+5:30
BBC documentary: २००२ च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या “इंडिया : द मोदी क्वेश्चन” वृत्तपटावर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) सुनावणी करणार आहे.
नवी दिल्ली : २००२ च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या “इंडिया : द मोदी क्वेश्चन” वृत्तपटावर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) सुनावणी करणार आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ज्येष्ठ विधीज्ञ, कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्या वतीने उपस्थित वकील एम. एल. शर्मा व ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग यांच्या युक्तिवादाची दखल घेऊन त्यांच्या स्वतंत्र जनहित याचिका तातडीने पटलावर घेण्याचे निर्देश दिले. शर्मा यांनी वृत्तपटावर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली.