विजय माल्ल्यांविरुद्धच्या याचिकेवर आज सुनावणी
By Admin | Published: March 9, 2016 05:05 AM2016-03-09T05:05:26+5:302016-03-09T05:05:26+5:30
उद्योगपती विजय माल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा, अशी विनंती १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला एका याचिकेत केली आहे.
नवी दिल्ली : उद्योगपती विजय माल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा, अशी विनंती १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला एका याचिकेत केली आहे. उद्या (बुधवारी) या याचिकेवर सुनावणीला न्यायालयाने सहमती दर्शविली.
सार्वजनिक बँकांच्यावतीने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिका सादर करताना तातडीने सुनावणीची विनंती केली. सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर, न्या. यू.यू.ललित यांच्या खंडपीठाने या याचिकेवर बुधवारी सुनावणी निश्चित केली. माल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. ही थकित रक्कम हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्याचे रोहतगी यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)