‘नोटा’विरोधातील याचिकेवर सुनावणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:22 AM2017-08-03T00:22:15+5:302017-08-03T00:22:20+5:30
नवी दिल्ली : गुजरातमध्ये ८ आॅगस्ट रोजी राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात ‘नोटा’चा (नन आॅफ द अबव) पर्याय ठेवण्याच्या निर्णयाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही याचिका सुनावणीस घेण्यास न्यायालयाने बुधवारी तयारी दर्शवली.
न्या. दीपक मिसरा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरिष्ठ वकील कपिल सिबल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करावी अशी विनंती केली. ‘नोटा’ ची तरतूद घटनेमध्ये कुठेच नाही, असे सिबल म्हणाले.
‘नोटा’चा पर्याय जानेवारी २०१४ पासून अमलात आला व तो राज्यसभा निवडणुकीत वापरण्याचे आदेश दिले गेले. काँग्रेसने नोटाचा पर्याय आगामी राज्यसभा निवडणुकीत वापरण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. असा पर्याय वापरणे निवडणूक कायद्यांचे उल्लंघन आहे, असे काँग्रेसचे म्हणणे होते. परंतु हा आदेश नवा नसून तो २०१४ पासून वापरात आहे,असे आयोगाने सांगितले.
नोटा भाजपालाही नको-
भारतीय जनता पार्टीनेही राज्यसभा निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय नसावा, असे म्हटले आहे.